पैसे असतील तर माणूस जवळच्या व्यक्ती साठी काहीही करू शकतो आणि कितीही मोठं गिफ्ट देऊ शकतो. कलाकार लोकं यांच्याकडे पैसाही खूप असतो. जे प्रसिद्ध स्टार आहे त्यांच्याकडे आणि ते मोठं मोठ्या महागडे गिफ्ट त्यामुळे देऊ शकतात. तर बॉलीवूड चा कबीर सिंग शाहिद कपूर ने आपल्या बायकोला किती कोटीचं घर दिलं आहे माहितेय ? तर चला मग तेच जाणून घेऊयात.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे बी टाऊनच्या फरफेक्ट जोडप्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. शाहिद आणि मीराची पार्श्वभूमी एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. मात्र, विवाहानंतर दोघांनी ज्या प्रकारे एकमेकांनुसार स्वत: ला बदलले ते कौतुकास्पद आहे. आम्ही तुम्हाला शाहिद आणि मीराच्या भव्य घराची काही फोटो आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत.

शाहिद आणि मीराच्या घराचा सर्वात नेत्रदीपक भाग म्हणजे त्यांच्या घराचा टेरेस. शाहिद आणि मीरा बर्‍याचदा घराच्या टेरेसवर एकमेकांशी क्वालिटी वेळ घालवतात, जे त्यांच्या इन्स्टाग्रामवर पहायला मिळेल.

या दोघांचे घर आतूनही फार सुंदर आहे. सुंदर पडद्यांसह इंटेरिअर मनमोहक आहे. जिथे मीरा अनेकदा तिचे जबरदस्त आकर्षक फोटो क्लिक करते.

शाहिद आणि मीराचे घर सी फेसिंग आहे. अशा परिस्थितीत समुद्राचे दृश्य घराच्या छतावरुन स्पष्ट दिसते. या फोटोत तुम्ही पाहु शकता की शाहिद आणि मीरा यांचे घर टूरिस्ट स्पॉट हॉटेलसारखेच दिसत आहे.

घराला आतून भव्य पेंटिंग्ज आणि फर्निचरने सजविले आहे. या घरात शाहिद कपूर पत्नी मीरा आणि दोन्ही मुलांसमवेत राहतो.

घराच्या आत आणि बाहेर हिरव्यागार गोष्टींची विशेष काळजी घेण्यात आली आहे, जे वातावरण ताजे ठेवते .शाहिद कपूरने हे घर तिच्या पत्नीला दुसऱ्या गरोदरपणात गिफ्ट केले होते. शाहिदच्या या घराची किंमत 56 कोटी असल्याचे सांगितले जाते.

एका मोठ्या वृत्तानुसार असे सांगितले जात आहे की वरळी येथे असलेल्या या अपार्टमेंटची किंमत 55 कोटी 60 लाख रुपये आहे आणि शाहिदने यासाठी सरकारला 2 कोटी 91 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.

लग्नाच्या दिवसापासूनच शाहिद कपूर आणि मीरा राजपूतची लव्ह लाईफ चांगली चालली आहे. 2016 मध्ये मीराने एका वर्षानंतर मुलीला जन्म दिला, जिचे नाव तिने मीशा ठेवले आहे. तर वर्ष 2018 मध्ये मीराने एका मुलाला जन्म दिला ज्याचे नाव त्याने जैन ठेवलंय.

दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यामुळे त्यांचं प्रेम कोटींच्या घरात व्यक्त होतं. तर त्यांच्या या प्रेमाला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा. नाती स्वच्छ पणे टिकली पाहिजेत.