John Abraham First Marathi Movie ‘Savita Damodar Paranjpe’

‘Savita Damodar Paranjpe’ John Abraham’s Upcoming Marathi Movie

 

बॉलिवूडमध्ये २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन संदेश देत अभिनेता जॉन अब्राहमने चित्रपट निर्मिती क्षेत्रात यशस्वीरित्या पदार्पण केले. दमदार कथानकांच्या चित्रपटांना प्राधान्य देत जॉनने आजवर त्याच्या ‘जेए’ निर्मितीअंतर्गत ‘मद्रास कॅफे’ (२०१३), ‘रॉकी हॅण्डसम’ (२०१६) आणि ‘फोर्स २’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. वेगळ्या कथानकांना प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडणारा जॉन आता मराठी चित्रपटसृष्टीकडेही वळला आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ ‘Savita Damodar Paranjpe’ या चित्रपटाची तो निर्मिती करत आहे.
प्रियांका चोप्रा, विक्रम फडणीस यानंतर आता जॉनने मराठी चित्रपटसृष्टीत उडी घेतली आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली असून त्याची माहिती स्वतः जॉन John Abraham नेच ट्विटरवरून दिली. सेटवरील एक फोटो शेअर करत, ‘जेए एण्टरटेन्मेन्ट्स मराठी फिल्मच्या ‘सविता दामोदर परांजपे’ ‘Savita Damodar Paranjpe’ चित्रपटाच्या सेटवरील पहिला दिवस… मी या चित्रपटाच्या कथेच्या प्रेमात पडलोय. अखेर मला चित्रपट निर्मिती करण्याची संधी मिळाली,’ असे त्याने ट्विटरवर लिहिले. दगा देणाऱ्या पुरुषाचा एक महिला कशाप्रकारे सूड घेते यावर या थ्रिलरपटाची कथा आधारित आहे. जॉनच्या ‘सविता दामोदर परांजपे’ ‘Savita Damodar Paranjpe’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन ‘फुगे’ चित्रपटाची दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे करत आहे. अभिनेता सुबोध भावे आणि राकेश बापट यात मुख्य भूमिका साकारताना दिसतील.