sawdhan-poster-hindi_201903207139

आपला देश बहुतांशी गावांमध्ये वसतो. भली मोठी शहरे विकसित झाली असली तरी त्यांची पोटे गावांमुळेच भरली जातात कारण आपल्या कृषिप्रधान देशातील तीन चथुर्तांश जनता शेती करते. शहरांमध्ये आयुष्य व्यतीत करणारे बरेचजण पहिला मौका मिळताच आपल्या गावी जातात, मनःशांती मिळवायला. खरंतर काँक्रीट जंगलामध्ये राहिल्यावर गावाकडच्या हिरवळीची ओढ अजूनच वाढते. त्यातच जे परदेशात स्थायिक झालेत त्यांना तर आपला देश, आपलं गाव नेहमीच खुणावत असतं. तिथल्या आठवणी तिथेच जन्मलेल्या आपल्या मुलांना सांगत ते आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. पालकांच्या डोळ्यात दिसणारे गावाचे प्रेम पाल्यांना नक्कीच गावाला भेट देण्यासाठी खुणावत असतं. अशाच एकाची गोष्ट ‘सावधान, पुढे गाव आहे’ या चित्रपटातून सांगण्यात आली आहे.

Savadhan-Pudhe-Gav-Ahe-Poster-Dowanload

हा चित्रपट एक सामाजिक संदेशही देऊ पाहतो. प्रवास करताना शक्यतो प्रत्येकालाच ‘सावधान, पुढे गाव आहे’ अशी पाटी दिसलीच असेल. पुढे गाव आहे की गाव पुढे आहे या शक्यतांचा विचार दिग्दर्शकाने प्रघल्बतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समाज माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाच्या पोस्टरवर ‘सावधान, पुढे गाव आहे’ या पाटीवर गिधाड बसलेले आढळून येते. त्यामुळे चित्रपटाच्या विषयात गूढताही असण्याची शक्यता आहे. ‘सावधान, पुढे गाव आहे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मुन्नावर शमीम भगत यांनी केले असून त्याची प्रस्तुती मीना शमीम फिल्म्सची आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून त्यामुळे प्रेक्षकांची त्याबाबत उत्कंठा वाढली आहे.


एका अनोख्या विषयावरील ‘सावधान, पुढे गाव आहे’ मध्ये रहस्य आणि उत्कंठा यांचे मिश्रण असणार असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.