मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती नुकतीच पार पडली. संपूर्ण राज्यभरात महाराजांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मात्र पुणे येथील भारती विद्यापीठ या ठिकाणच्या शिवजयंती सोहळ्यात एक लक्ष्यवेधी कार्यक्रम करण्यात आला. जयंतीनिमित्त ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ या सिनेमाच्या तिसऱ्या खतरनाक पोस्टरचे अनावरण जल्लोषात पार पडले. सोशल मीडियावर ‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमाचे तिसरे पोस्टर तुफान व्हायरल होतंय. शंभूराजे प्रतिष्ठान भारती विद्यापीठ,पुणे आयोजित शिवजयंती सोहळा धुमधडाक्यात पार पडला.

त्याच ठिकाणी या सिनेमाच्या पोस्टरचे लौंचिंग करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात लक्ष्यवेधी पोस्टर सर्वांच्या भेटीस आले.  शेकडो प्रेक्षकांची गर्दी पोस्टर पाहण्यासाठी जमली होती. खतरनाक पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यावेळी कित्येक प्रेक्षकांना पोस्टर सोबत सेल्फी,फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. इतकं थरारक आणि आकर्षक पोस्टर या सिनेमाचे आहे. हा सोहळा कोणत्याही बंद सभागृहात नव्हता तर रस्त्याच्या कडेला चौकात होता. या सोहळ्याला शिवभक्तांची आणि प्रेक्षकांची गर्दी बघून आश्चर्य वाटले. या सोहळ्यात सिनेमाचे निर्माते संदीप मोहिते पाटील, धर्मेंद्र बोरा आमदार,खासदार,नागरसेवक, सामाजिक कार्यकर्ते अशी विविध क्षेत्रातली मंडळी उपस्थित होती.

नुसत्या पोस्टर लौंचिंग सोहळ्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद बघता हा सिनेमा हाऊसफुलचे बोर्ड झळकवणार असा अंदाज लावला तर वावगा ठरणार नाही. मुळशी पॅटर्न या सिनेमाच्या खतरनाक यशानंतर दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा थरारक पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार यात शंका नाही.  मराठी सिनेसृष्टीतील बिग बजेट आणि भव्यदिव्य सिनेमा ठरणार असल्याची माहिती देण्यात येतीये. नुकताच तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित सिनेमाने संपूर्ण देशाला वेधून घेतले. याच प्रमाणे हा भव्यदिव्य असा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झेंडा रोवेल यात शंका नाही.
स्वराज्यातील सर्वात मोठा योद्धा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या थरारक जीवनपट आपल्याला पडद्यावर अनुभवण्याची संधी तरडे आपल्याला देत आहेत.

तरडे यांच्या खतरनाक लेखणीतूनच हा सिनेमा तयार झाला असून सिनेमाचं दिग्दर्शनही स्वतः तरडे यांनीच केले आहे. उर्विता प्रोडक्शन प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी केली आहे.
तरडे यांचा मराठी सिनेसृष्टीला एक वेगळा खतरनाक पटर्न दाखवला त्याच ताकदीचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा ऐतिहासिक पॅटर्न देखील महाराष्ट्राच्या मनात घर करेल. सिनेमाचे पोस्टर बघून प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झाले आहे.हा ऐतिहासिक पॅटर्न बघण्यासाठी मात्र जून महिन्यापर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे.
तर मंडळी, तरडे यांचा थरारक पॅटर्न ‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमाचं पोस्टर तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.