Saraswati Serial Raghav Bought Sarees For Saraswati

1146

देविकाच्या येण्याने सरस्वती –  राघावमध्ये कायमचा दुरावा

राघव आणि देविकाचे होणार शुभमंगल सावधान !

राघवच्या मृत्यूनंतर सरस्वतीच्या आयुष्यात अनेक अडचणीसंकंट आली. विद्युलची कारस्थानंराघवने सरस्वतीला घरा बाहेर काढणेविद्युलने तिला घरी नोकर म्हणून आणणे हे सगळ सरस्वतीने सहन केले. परंतु आता मात्र विद्युलने सरस्वतीला राघवच्या आयुष्यातून कायमच काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तिने देविका नामक मुलीला वाड्यामध्ये आणले. विद्युलच्या या कारस्थानाला अनभिज्ञ सरस्वती तिच्यातील आणि राघवमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते आहे. विद्युलचा देविकाला आणण्या मागचा उद्देश होता राघव आणि देविकाचे लग्न. आता सरस्वती पुढे काय करेल कसे हे कटू सत्य पचवेल राघव हे कळल्यावर काय करेल? हे बघणे रंजक असणार आहे. महाराष्ट्राची लाडकी जुई गडकरी देविकाची भूमिका वठवते आहे.

 विद्युलला पहिल्यापासूनच अख्या भैरवकरांच्या संपत्तीवर डोळा होता आणि तिला काही करून ती सगळी  संपत्ती मिळवायची होती. पण सरस्वतीने हे कधीच साध्य होऊ दिले नाही. आपला हा हेतू साध्य करण्यासाठी विद्युलने देविकाला वाड्यामध्ये आणले. देविकाच्या मदतीने ती हि संपत्ती मिळवू शकते आणि राघवच्या मनामध्ये देखील तिचे स्थान अढळ राहील असे तिला वाटले आणि विद्युलने हा कट रचला ज्यामध्ये ती यशस्वी देखील झाली. पणहळूहळू राघवच्या मनामध्ये सरस्वती बद्दल असलेला गैरसमज दूर होऊ लागला आहे हे कळताच विद्युलने सरस्वतीला धमकी देऊन आता तुच राघव आणि देविकाचे लग्न लावून दे असे सांगितले. आता सरस्वती हे करण्यास का तयार झाली विद्युलने तिला काय सांगून हे करण्यास भाग पाडले हे तुम्हाला मालिका बघितल्यावर कळेलच. याच दरम्यान देविका मुकी नाही तिला बोलते येते हे सत्य देखील सरस्वतीला कळते. या सगळ्या कट – कारस्थाना मध्ये विद्युलच यशस्वी ठरते आणि राघव आणि सरस्वतीला कायमच दुर करते आणि देविकाच लग्न ती राघवशी लावून देते.

 आता सरस्वती या कटू सत्याला कशी स्वीकारणार सरस्वतीला राघव परत मिळू शकेल ? विद्युल राघवची संपत्ती हडपण्यात यशस्वी ठरेल हे बघण्यासाठी बघत रहा सरस्वती सोम ते शनि संध्या. ७ वा. कलर्स मराठीवर.