गेल्याच आठवड्यात गोविंदा आणि करिश्मा कपूर ह्यांच्या कुली नं. 1 ह्या चित्रपटाचा रिमेक ऍमेझॉन प्राईम ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीस आलेला हा चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस न आल्याचं दिसून आलं आहे.

वरुण धवन- सारा अली खान ही नवीन स्टार किड जोडी ह्यामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली खरी पण प्रेक्षकांना ती भावली नसल्याचं दिसून येतं. सुपरहिट चित्रपट असलेला कुली नं. 1 रिमेकमध्ये मात्र सपशेल पडला.

ह्या चित्रपटातून सारा आणि वरुण कॉमेडी करताना प्रेक्षकांना दिसून येणार आहेत. साराला तिच्या कॉमेडी भूमिकेबद्दल विचारण्यात आले असता “मी माझ्या वडिलांप्रमाणे किंवा माझ्या आईसारखी नाही. कॉमेडी करणे ही एक कठीण गोष्ट आहे. ह्यासाठी वरुणने मला खूप मदत केली आहे. त्याने माझी कॉमिक टायमिंग  सुधारण्यास मदत केली. तो या प्रकारात जास्त अनुभवी आहे.” असे ती म्हणाली.

डेव्हिड धवन दिग्दर्शित वरुण- साराचा हा चित्रपट फ्लॉ’प झाला असला तरी ह्या चित्रपटातून वरून धवन, डेव्हिड धवन, परेश रावल ह्या कलाकारांनी कोट्यवधीची कमाई केली आहे.

केदारनाथ चित्रपटातून पदार्पण केलेली आणि पदार्पणातच सुपरहिट ठरलेली सारा मात्र ह्या चित्रपटामुळे ट्रो’ल झाल्याचं दिसून येत आहे.

सैफ अली खान आणि अमृता सिंग ह्यांची ही कन्या सारा अली खान अल्पावधीतच अनेकांच्या ग’ळ्या’ती’ल ताईत बनली आहे. चित्रपटाव्यतिरिक्त अनेक कारणांमुळे सारा नेहमीच चर्चेत असते.

कुली नं. 1 मधील साराच्या अभिनयाची तुलना करिश्मा कपूरशी करून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. सिंबा, लव आज कल 2 ह्या चित्रपटात दिसून आलेली सारा एका चित्रपटासाठी 2-3 कोटी रुपये एवढं मानधन घेते. कुली नं. 1 साठी साराने चक्क 8 कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याची चर्चा आहे.

कुली नं.1 मध्ये मुख्य भूमिका करणारा आणि सारासोबत दिसून आलेला वरुण धवन एका चित्रपटासाठी तब्बल 35- 38 कोटी रुपये एवढी फिस आकारतो. ह्या चित्रपटासाठी त्याने  25 कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याची चर्चा आहे.

कुली नं. 1 ह्या चित्रपटात वरुण-सारा सोबत परेश रावल, जॉनी लिवर, जावेद जाफरी, राजपाल यादव, जॅकी भग्नानी ह्यांनी देखील काम केलं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.