सारा अली खान अलीकडे सोशल मीडियावर सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेचा विषय झाली होती. आता एक खरी गमतीची बात म्हणजे, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हा अभिनेता या दोघांच्याही अ’फे’य’र्स’च्या आजवर अनेक बातम्या रंगत होत्या.

परंतु त्या अगदी स्पष्टपणे खोट्या असल्याच आता समोर येत आहे. जरी काही दिवसांपूर्वी सारा अली खान कार्तिक आर्यन याच्यासोबत डिनरसाठी सोबत बाहेर गेली असली तरीदेखील तिच्या मनातील राजकुमार कोणी दुसराच असल्याचं ह’ल्ली समजलं आहे. सध्या साराच्या रिलेशनशीपबाबत एक नाव चर्चेत समोर आलं आहे आणि ते म्हणजे नुकताच दाक्षिणात्य सिनेमातून वर आलेला सुपरस्टार विजय देवरकोंडा.

विजय देवरकोंडा याच्यासोबत साराचं नाव जोडल्या जाण्याचं कारण म्हणजे, विजय त्याच्या आगामी बॉलीवुड सिनेमाकरता मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास आहे. तो आणि अनन्या पांडे ही जोडी या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तरीदेखील विजय देवरकोंडा शुटिंगव्यतिरिक्त इतर वेळ हा सारासोबत घालवत असल्याच पहायला मिळतं आहे.

नुकत्याच मनीष मल्होत्रा या डिझाईनरच्या घरी झालेल्या पार्टीमधे सारा खुप जास्त वेळ विजयसोबतच असल्याची पहायला मिळाली. पा’र्टी’मधे दोघेही इतरांच्या चर्चेचा विषय झाले असल्याचीही खबर आहे. या पार्टीला अनेकांनी हजेरी लावली असल्याचं पहायला मिळालं.

सध्यातरी अनेकांना वाटते आहे की, कदाचित सारा अली खान आणि विजय देवरकोंडा एका नव्या सिनेमाचा विचार एकत्र करण्याकरता एकत्र वावरत आहेत. परंतु एखाद्या सिनेमाकरता इतका अधिकवेळ फार कुणी घालवत नाही. त्यामुळे कुठेतरी साराच्या मनात हा दाक्षिणात्य उभरता तारा अर्थात विजय देवरकोंडा भरला आहे की काय अशी साशंकता आता निर्माण झाली आहे.

“लि’ग’र – साला क्रॉसब्रीड” हा नवा बॉलिवुडमधील सिनेमा विजयचं बॉलिवुडमधे पदार्पण असणारा सिनेमा ठरणार आहे. पुरी जग्गनाथ हे दिग्दर्शक या सिनेमाच दिग्दर्शन करणार आहेत, शिवाय यात अनन्या पांडेही दिसणार आहे. आणि याच्या निर्मितीचा जिम्मा करण जोहर याने उचललेला आहे. केदारनाथ, लव्ह आज कल, सि’म्बा, यांसारख्या सिनेमानंतर सारा आता पुढे नेमक्या कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहे? याची पुरेपूर खबर अजूनतरी उपलब्ध झालेली नाही.

दुसरीकडे विजय देवरकोंडा याच्याबाबत सांगायच म्हटलं तर मोठ्या पडद्यावर दाक्षिणात्य चित्रपटात रश्मिका मंडन्ना आणि विजय देवरकोंडा ही जोडी अगदीच जास्त प्रमाणात सुपरहीट ठरलेली आहे. अर्जुन रेड्डी, डिअर कॉ’म्रे’ड, गिता गोविंदम, टॅक्सीवाला, द्वारका, यांसारख्या अनेक चित्रपटांमधून विजयने त्याची छा’प पाडली आहे.

आचमपेट, आंध्र प्रदेश येथे जन्म झालेल्या विजयचा सिनेमासृष्टीत आजवर झालेला प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरला आहे. तेलुगू सिनेमांमधून विजयने आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. दुसरीकडे सारा अली खान एकप्रकारे ने’पो’टि’झ’म स्टारकिड असल्याने तिला सुरूवातीला सिनेमांमधे जास्त मेहनत करावी लागली नव्हती. परंतु आता हळूहळू ती तिच्या अभिनय कौशल्यावर काम करत असल्याने तिचं सिनेसृष्टीतलं भविष्य पाहणं रसिकप्रेक्षकांसाठी एक उत्तम बाब असेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!