मित्रांनो!, ऐन गणेशोत्सवाच्या काळात १० सप्टेंबर हा काळा दिवस म्हणून ठरला आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात एका ३४ वर्षीय महिलेवर नि’घृ’ण’पणे ब’ला’त्का’र करण्यात आला. त्यानंतरही क्रौ’र्य थांबले नाही तर, दिल्लीतील निर्भयाप्रमाणे या पीडित महिलेच्या गु’प्तां’गात लोखंडी रॉड घुसवून क्रौ’र्याची परिसीमा गाठली गेली. दु’र्दै’वाने या पीडित महिलेचा शनिवारी मृत्यु झाला. परंतु, तिच्या वेदनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
याविषयी बोलतांना अभिनेत्री फातिमा सना शेखने बालवयात तिच्या स्वतःवर झालेल्या अ’त्या’चाराला वाचा फोडली आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिला लैं’गि’क शोषणाला सामोरं जावं लागलं होतं, असं तिने सांगितलं आहे. विशेष म्हणजे याचवेळी ती बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचवरही व्यक्त झाली. फातिमा सना शेखने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ती कलाविश्वातील कास्टिंग काऊच आणि बालपणात तिने सहन केलेला अ’न्याय यावर व्यक्त झाली आहे.
“मी केवळ तीन वर्षांची होते त्यावेळी माझा वि’न’य’भंग करण्यात आला होता. हा एक प्रकारचा असा कलंक आहे ज्यावर स्त्रिया कधीच उघडपणे व्यक्त होत नाहीत. परंतु, आता हळूहळू का होईना काळ बदलेलं अशी मला आशा आहे. देशातील आणि जगातील लोकांमध्ये लैं’गि’क छळाबाबत असलेली जागृकता वाढू लागली आहे. पण, एक काळ असा होता की लोकांमध्ये गैरसमज होईल या भीतीने कोणीही या मुद्द्यावर खुलेपणाने व्यक्त होत नव्हतं.”
ती पुढे म्हणाली की, “कास्टिंग काऊचमुळे अनेकदा माझ्या हातातून कित्येक कामं गेली आहेत. तू कधीच अभिनेत्री होऊ शकत नाही. तू दीपिका किंवा ऐश्वर्यासारखी दिसत नाही. तू कशी काय अभिनेत्री होशील? अनेकदा लोक तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतात. या लोकांच्या मते केवळ सुंदर दिसणारीच मुलगी अभिनेत्री होऊ शकते. पण मी त्यांच्या साच्यात बसत नाही.
मात्र, आता माझ्याकडे अनेक संधी आहेत. जे सर्वसामान्य आणि सरासरीचे असतात, जे सुपरमॉडल्स नसतात अशा माझ्यासारख्या व्यक्तींसाठीही चित्रपट तयार केले जातात.” दरम्यान, “मला कास्टिंग काऊचचाही सामना करावा लागला. जर तू शरीरसंबंध ठेवलेस तरच तुला काम मिळेल, असंही मला एकेकाळी सांगण्यात आलं होतं,” असं म्हणत सनाने कलाविश्वातील कास्टिंग काऊचवर मौन सोडलं आहे.