होय मित्रांनो! हे खरे आहे. अगदी पहिल्यांदाच असे घडतेय की, भाईजानच्या घरी त्याच्याच अनुपस्थितीत होणार गणरायाचं आगमन. आपण सर्वजण हे जाणतोच की, दीड दिवस सलमान खान मोठ्या श्रद्धेने आणि मनोभावे बाप्पाची आराधना करतो. जितका अनोखा सलमान आहे तितकी त्याची गणेशभक्तीही मुंबईसह देशभरात प्रसिद्ध आहे. काय असते की, बॉलीवुडची ही मंडळी जितकी भावनिक तितकीच नेहमी श्रद्धेने भरलेली असल्याचे पाहायला मिळते. यांत आवर्जुन नाव घ्यावे लागेल ते म्हणजे भाईजान सलमान खानचं.

दरवर्षी सलमान बाप्पा भक्तीत लीन होत असल्याचे पाहायला मिळते. वाजत गाजत बाप्पाचे सलमानच्या घरी जल्लोषात आगमन होते. मोठ्या उत्साहात सलमान आपल्या कुटुंबासोबत बाप्पाची भक्ती करतो. दीड दिवस सलमान मोठ्या श्रद्धेने आणि मनोभावे बाप्पाची आराधना करतो. जितका अनोखा सलमान आहे तितकी त्याची गणेशभक्तीही मुंबईसह देशभरात प्रसिद्ध आहे. कामात तो कितीही बिझी असला तरी गणेशोत्सवा दरम्यान तो वेळात वेळ काढून कुटंबासोबत हा उत्सुव साजरा करतो. पण यंदा सलमान असे करु शकणार नाही. यावर्षी सलमानच्या घरी गणेशोत्सव हा सलमानविनाच साजरा होणार आहे.

कारण ‘टागर ३’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये तो बिझी आहे.ऑस्ट्रेलियात तो सिनेमाचे शूटिंग करतोय. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात त्याला सहभागी होता येणार नाही. सिनेमाचे शूटिंग वेगवेगळ्या देशात केले जात आहे. सिनेमाच्या काही भागांचे शूटिंग याआधी रूस आणि तुर्कीमध्ये करण्यात आले होते. सलमानसोबत कटरीना कैफ, अभिनेता इमरान हाशमी यांच्याही भूमिका आहेत. ते देखील सलमानसोबत ऑस्ट्रेलियामध्येच आहेत.

सध्या सलमान त्याच्या ‘टायगर ३’ सिनेमामुळेच जास्त चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शूटिंगदरम्यान त्याचा लूकही समोर आला होता. लांब तपकिरी केस आणि वाढलेली दाढी असा त्याचा हा लूक होता. सलमानचा हा लूक प्रचंड चर्चेत होता. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सलमान खानसोबत त्याचा भाऊ सोहेल खानचा मुलगा निर्वाण खानही दिसत होता. व्हायरल झालेल्या लूकमुळे सिनेमा पाहण्याची चाहत्यांमध्ये आत्तापासून उत्सुकता वाढल्याचे पाहायला मिळाले.

टायगर फ्रँचायजीचा हा तिसरा सिनेमा असणार आहे. पहिला सिनेमा ‘एक था टायगर’, दुसरा ‘टायगर जिंदा है’ आणि तिसरा ‘टायगर ३’ आहे. सिनेमाच्या दोन्ही भागांनी रसिकांची पसंती मिळवली होती. ‘टायगर ३’ हा २०२२ मध्ये रिलीज होईल. २०२२ मधील सर्वात मोठा बॉलिवूड सिनेमा असणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता तिसरा भाग कसा असणार याचीच उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असणार हे मात्र नक्की.