Published on Apr 22, 2016

Presenting you with the Official Trailer of Sairat.
Official selection at 66th Berlin International Film Festival.
Directed by Nagraj Manjule.

 

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळेचा बहुप्रतिक्षीत सैराट या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. टीझर आणि ट्रेलरमुळे ‘सैराट’ने नक्कीच उत्सुकता ताणून धरलेली आहे.

 

फँन्ड्रीनंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित हा दुसरा सिनेमा आहे. प्रदर्शनाआधीच या सिनेमाच्या गाण्यांनी अनेकांना वेडही लावलं आहे.

नववीत शिकणारी आर्ची, 13 किलो घटवलेला परशा, सारं काही ‘सैराट’!

सैराटमधील झिंगाट, सैराट झालं जी आणि याड लागलं या गाण्यांनी चाहत्यांच्या मनावर अक्षरश: अधिराज्य गाजवलं आहे. अजय-अतुल यांचा आवाज आणि संगीताच्या तडक्यामुळे ही गाणी आता सगळीकडेच गुणगुणली जात असल्याचं दिसून येतंय.

 

येत्या 29 एप्रिलला परशा आणि आर्ची यांची अनोखी प्रेमकहाणी भेटीला येत आहे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here