सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर ‘मिस मालिनी’च्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात एकत्र! 

अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांच्या हेल्दी कॉम्पेटिशनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मग त्यांचे अगदी ‘फिगर इन’ राहणं असो किंवा रेड कार्पेट वर एकसे बढकर एक स्टाईल स्टेटमेंट करणं दोघीही सध्या एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे. परंतु ह्या दोघी एकत्र पब्लिक अँपिअरन्स देतानाही दिसत आहेत. नुकतंच एका बॉलीवूड फॅशन ब्लॉगरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ह्या दोघीनी एकत्र उपस्थिती लावली.

सगळ्याच बॉलीवूड स्टार्स आणि चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सर्वांची hot favorite असणाऱ्या मिस मालिनीच्या पुस्तक सोहळ्यात मराठीतल्या दोन हॉट फेव्हरिट्सने हजेरी लावली होती. मिस मालिनी बॉलीवूड विश्वातली एक नावाजलेली फॅशन ब्लॉगर आहे. अगदी शाहरुख खान, अक्षय कुमार पासून विद्या बालन, इरफान खान सर्वच बॉलीवूड सेलिब्रिटी मिस मालिनीच्या मुलाखतीमध्ये, सोशल मीडियावर विशेष उपस्थिती लावतात. प्रत्येक बॉलीवूड सेलिब्रिटी आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आवर्जून ‘मिस मालिनी’ ची भेट घेतात. काही दिवसांपासून मराठीतल्या ह्या दोन कलाकारांची विशेष उपस्थिती जाणवली ती मिस मालिनीच्या सोशल मीडियावर जाणवत आहे. आणि मिस मालिनीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ह्या दोघींना ही विशेष आमंत्रण होतं.

सई आणि अमृता दोघीही मिस मालिनीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित होत्या. आणि दोघीनीही एकत्र फोटोज ही क्लीक केले. शिवाय पुन्हा एकदा दोघीनी परिधान केलेले कपडे मिस मालिनीच्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. बॉलीवूडच्या हया मांदियाळीत ह्या दोन मराठी अभिनेत्रीनी लावलेली हि उपस्थिती लक्षवेधी आहे.