सचिन पिळगावकर यांच्या गाजलेल्या जुन्या सदाबहार गीतांचे स्वर उमटणार – सरगम चा किड्स स्पेशल एपिसोड

बाल कलाकार ते आजपर्यंत अतिशय सहजरित्या सर्व प्रकारच्या भूमिका लिलया साकारणारे Sachin Pilgaonkar सचिन पिळगांवकर हे सर्वांचे आवडते नट असून त्यांनी मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, नाटकांतून अभिनय केला आहे. सरगमच्या किड्स स्पेशल एपिसोड मध्ये लहान मुलांबरोबर त्यांच्यातील एक होऊन गाऊ शकतील असं एकचं नाव होत ते म्हणजे सचिन पिळगांवकर या आठवड्यात १९ एप्रिल आणि २० एप्रिल  ला सरगम मध्ये किड्स स्पेशल कार्यक्रम रात्री ९ वाजता रंगणार आहे . आणि या कार्यक्रमामध्यें सचिन पिळगांवकर त्यांची आजपर्यंत गाजलेली अनेक गाणी प्रेक्षकांसमोर ते सादर करणार आहेत.

‘Sargam’ सरगम या कार्यक्रमात सचिन पिळगांवकर हा प्यार हमे इस मोड पे ले आया , बडे अच्छे लगते है , लागा चुनरी मी दाग , अशी हि बनवाबनवी , माझा मार्ग वेगळा ही गाणी तर त्याच प्रमाणे अनेक टॅलेंटेड लहान मुले इतर उत्तोमोत्तम गाण्यांनी सचिनजींना साथ देणार आहेत

सरगम हा कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत करीत असून स्किनसिटी सह प्रायोजक आहेत आणि महा केशामृत स्पेशल पार्टनर आहेत.“सरगम” या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जवाबदारी उर्मिला कोठारे यांनी उचलली आहे. आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते आहेत. ह्या कार्यक्रमाचे शीर्षक गीत शंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे आणि सिद्धार्थ आणि सौमिल यांनी संगीतबद्द केले आहे. “सरगम” हा कार्यक्रम दर बुधवार आणि गुरवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येईल.पाहता येईल.

Sachin Pilgaonkar And Kids Special Episodes  Sargam Photos

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here