पैसा आला की माणूस मग एशो आरामात जीवन जगायला लागतो. फिल्म इंडस्ट्रीत तर ग्लॅमर आणि पैसा मिळाला की मग कलाकार खूप मजा करायला लागतो. राहणी मान आणि जगणं बदलतो.

आज आपण अश्याच एका चर्चेत आलेल्या अभिनेत्री बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जी सध्या खूप व्हायरल होत आहे. नेमकं ती अभिनेत्री कोण ? आणि काय करते ? झालं काय ? चला मग हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे अनेक कलाकार प्रकाश झोतात आले आहेत. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले. अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केलेल्या रुपालीची सोशल मीडियावर कायचम चर्चा रंगत असते.

यामध्येच सध्या चर्चा रंगली आहे ती रुपालीच्या एका बर्थ डे गिफ्टची. काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. विशेष म्हणजे या वाढदिवशी रुपालीने स्वत:लाच एक छान गिफ्ट दिलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या रुपालीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ही ग्लॅमरस अंदाजात दिसत असून तिच्या बाजूला एका लॅविश कार असल्याचं पाहायला मिळत आहे.

रुपालीने तिच्या वाढदिवसानिमित्त स्कोडा या कंपनीची कार खरेदी केली असून त्याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. सोबतच एक खास कॅप्शनदेखील दिलं आहे. आणि ती इथे आहे.

ती फक्त चारचाकी किंवा इंजिन नाहीये, तर माझ्यासाठी ते घर आहे. ही डुग्गू मी स्वत:लाच वाढदिवसाची भेट म्हणून दिली आहे. स्वागत आहे. माझ्या कारलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं कॅप्शन रुपालीने या पोस्टला दिलं आहे.

रुपालीने शेयर केलेले फोटो सध्या फार व्हायरल होत आहेत. तिला तिच्या नवीन गाडी साठी खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.