ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

एका गाण्यांच्या रेकॉर्डींगसाठी जायचे होते. अचानक सुम्याचा फोन आला , म्हटला दाद्या आज ROM-COM पुन्हा रिलीज होतोय , आपल्या विजयचा फोन होता तुम्ही याच प्रिमिअर शोला . आधी हा ना , हा ना करत शेवटी मी तयार झालो , सिंहगड रोडच्या fun time ला 1.30 चा शो होता . आता पुन्हा रिलिज आहे म्हणून चिञपटाकडे माझा बघण्याचा दृष्टीकोन आधीच थोडा निगेटिव होता. तिथे गेलो, प्रमुख अभिनेता विजय गिते, आणी बाकी टिमही तशी ओळखीची होती,सर्वांना Hi, Hello करून चित्रपट गृहात बसलो, सुरूवातीला विजयचा शहारुख बनुन आलेल्या बाजिगरच्या सिनने टाळ्या मिळवल्या .

पुढ हळूहळू विजय म्हणजेच चिञपटातील राहूल आपला सा वाटू लागला, प्रेम मिळावे म्हणून केलेली प्रामाणिक धडपड प्रत्येकाला आवडु लागते , चिञपट वेडा कलाकार आणि त्या कलाकाराच वेड प्रेम लेखक आणि दिग्दर्शकाने जे मांडले आहे त्याला तोडच नाही, ,जसजशी कथा पुढ सरकते राहुल्याचे उपद्व्याप त्यातुनही निर्माण झालेले हास्यरंग, प्रेक्षकांना खळखळून हसवत, तर एकीकडे हळव्या मनाच्या त्या निख्खळ प्रेमाची किव ही येते. राहुल सोबत त्याचा मित्र छोट्या (फकिरा वाघ) तो तर हसुन हसुन लोटपोट व्हायला लावतो. सहाय्यक अभिनय कसा असावा याच एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही, एका लग्नातल्या त्याच्या डान्स स्टेप मात्र तो किती अपितर आहे हे दाखवुन जाते.

ज्या मुलींच राहुल्या नाव घेतो, जिच्या हाताला चिट्टी बाधतो, सर्वांचाच अभिनय कडक आहे. त्यामुळे पुढं पुढं चित्रपटांची पकड अधिकच मजबूत झाली आहे ,राहुल्याचे वडील किशोर कदम, आणि आई यांनी तर चिञपटाला वेगळीच फोडणी आली, किशोर कदमांचा जेवतांना केलेला विनोद खुप हसवुन जातो, तर आईच्या भांडणात तिचा पोरावरच प्रेम दिसल, सहजच प्रत्येकाला स्वतःची आई आठवली आणि ती आई ही आपलंस करुन गेली, त्या मुलीच्या बाजुने आलेल्या आई अन आजी ही लक्षात राहिल्या कारण अश्या व्हिलन सर्वांच्या आजुबाजूला असतातच, त्यात त्यांचा अभिनय ही तितकाच खरा वाटला .

आता येवूयात अभिनेत्रीकडे , कास्टींगवाल्याच या ठिकाणी अभिनंदन करावे तेवढं कमी आहे बाबा, आधी असलेली गावातील मुलगी जिच्या हातावर चिठ्ठी बांधल्यावर तिला परत दाखवले नाही हे दुःखं वाटु लागते, तोवर हळूच गावी आलेली पाहुणी सोनम ( मधुरा वैद्य) तिच्या जिवघेण्या अदांनी आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांना सहज भावते आणि प्रेमात पडायलाच होत, आता इथं दिग्दर्शकाला मानलं इतक्या आयडिया दिल्या आहेत प्रेम व्यक्त करण्याच्या किरा विचारुच नका. निख्खळ प्रेमातील अपयशा नंतरच्या सातत्याने काही वेगळीच मजा आली. त्यात भरातभर गॅरेज वाली सगळी गॅग कडक निघाली ,खर्या प्रेमात ही अशी माणसं मिळतात हे मनाला खुप सुखावल .

बाकी शेवटी शेवटी संपूर्ण व्हिलन गॅगवर अन्याय झाला अस मला वाटल पण त्यांची अक्टिंग जबरा झाली आहे ….ROM COM का बघावा असं कुणाला वाटलं तर ? तुमच्या आग्रहाखातर पुन्हा आलाय,मराठीतील भावी शाहरूख नक्की बघा ,विजयकड बघून एक नक्की वाटंत की मराठी चित्रपट सृष्टीतल आश्वासक भविष्य आहे. मधुरा हिच्या बद्दल काय बोलाव ,हसणं, दिसण,बोलणं अगदी रडणं ही बघावस वाटत बाबा सारंच अगदी नावासारखं. .. ………… मधुर अभिनय हा खराखुरा वाटतो हेच यश म्हणावं . फकिरा वाघ या पोराचं कराव तेवढं कौतुक कमीच आहे.इब्रिस गॅरेज मजा काही औरच आहे .- love , romance ,Comedy, tragedy, असं सर्व काही भरभरून असलेला चिञपट म्हणजे ROM COM . मि पाहिला ,आपणही पहा ,फुल्ल पैसा वसुल Entertainment आहे नक्की बघाच आपल्या जवळच्या चिञपट गृहात

……… आपलाच MusicStarPJ