Rj Malishka Red Fm Hit Back At Bmc With Another Vedio

1323

‘रेडएफएम’ने पुन्हा साधला ‘बीएमसी’वर निशाणा
बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसीवर आर जे मलिष्काने गाण्यातून केलेल्या टीकेनंतर तिच्यावर ‘बीएमसी’ आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आता मलिष्काच्या रेडिओ स्टेशनने म्हणजेच रेड एफएमने त्यावर आणखी एक नवा व्हिडिओ व्हायरल केला आहे.
खड्ड्यांच्या स्थितीवर या व्हिडिओतून पुन्हा एकदा तिखट भाष्य करण्यात आले आहे, हा व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मात्र पहिल्यांदा रेडएफने रेल्वेला सोडले आहे. यावेळी फक्त बीएमसीवर निशाणा साधला आहे. रेड एफने फक्त शिवसेनाच नाही, तर दिल्ली महापालिकेवरही निशाणा साधला आहे, या व्हिडीओचे शुटिंग दिल्लीत करण्यात आले आहे.