rinku-rajguru-started-shooting-of-sairats-kannada

Rinku Rajguru Started Shooting Of Sairat Kannada


कन्नड ”सैराट”चे शूटींग सुरू, रिंकु राजगुरूचे ‘सिमोल्लंघन’ !

सैराट’ चित्रपटाच्या कन्नड भाषेतील रिमेकचे शूटींग सुरू झाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रिंकु राजगुरु काम करणार असल्याची चर्चा होती. होय, ही चर्चा खरी ठरली असून रिंकु कन्नड रिमेकची नायिका बनली आहे. या चित्रपटात रिंकुचा नायक बनला आहे साऊथ इंडियातील प्रसिध्द खलनायक सत्यप्रकाश यांचा मुलगा सी. बी. राज. कन्नड ‘सैराट’चे दिग्दर्शन एस. नारायण करीत आहेत.


कन्नड चित्रपटासाठी १२०० हून अधिक मुलींचे ऑडिशन घेण्यात आली होती. मात्र आर्चीच्या भूमिकेला न्याय देऊ शकेल असा एकही चेहरा यामध्ये निर्माता रॉकलईन रमेश यांना सापडला नव्हता. अखेरीस दिग्दर्शक एस. नारायण यांनी रिंकु राजगुरुने ही भूमिका करावी अशी इच्छा व्यक्त केली होती. यंदा १० वी चे वर्ष असल्यामुळे रिंकु याला होकार देईल की नाही, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र ही अटकळ खरी ठरली असून कन्नड ‘सैराट’चे शूटींग सुरू झाले आहे.

‘सैराट’च्या कन्नड रिमेकच्या शूटींगच्या वेळचे फोटो सोशल मीडियावर लिक झाले असून आता हे फोटो व्हायरल होत आहेत. ‘सैराट’मध्ये आर्ची आणि परशा आपल्या मुलासह प्लॅट बघायला जातात हा सीन सुरू असतानाचे हे फोटो आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here