Presenting the full video of Rang He Premache Rangeele sung by Keval Walanj.
रंग हे प्रेमाचे रंगिले
” श्री गणेशा मराठी लघुपट महोत्सव …” एक प्रतिष्ठेचा असा लघुपट महोत्सव ….
नेहमी प्रमाणेच काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने फक्त फेस्टिव्हल पुरतंच मर्यादित न राहता यात सहभागी
झालेल्या अनेक प्रतिभावंत तरुणांना घेऊन आयोजक “श्री जी इंटरटेनमेंट ” आणि “ए & ए फिल्म्स “यांनी “रंग हे प्रेमाचे रंगिले” या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा विषय आहे प्रेम,प्रेम आणि फक्त प्रेम.
प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी प्रेम होतेच. या प्रेमाचे अनेक प्रकार आहेत, अनेक रंग आहेत.प्रेमाचे असेच काही रंग उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे.
सारा श्रवण, रोहन गुजर, रेश्मा शिंदे, पंकज खामकर, सिद्धी दळवी, कुणाल देवलकर, प्रथमेश डोंगरे, आकांक्षा महाडिक हे चित्रपटातले कलाकार
नव्या चेहऱ्यांना आणि नव्या टेलंट संधी देणारा हा अजून एक सिनेमा आहे असेही या निमित्ताने आपल्याला म्हणता येईल. या चित्रपटात 5 दमदार गाणी असून हि या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
प्रेम प्रेम आणि फक्त प्रेमावर आधारित हा चित्रपट येत्या 24 नोव्हेंबर 2017 ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आपल्या भेटीला येत आहे.