ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये 1970 च्या काळात अनेक ग्लॅमरस आणि सुपरहिट अभिनय करणाऱ्या कित्येक अभिनेत्री होऊन गेल्या आहेत. या अभिनेत्रींचे चित्रपट आजही त्यांचे चाहते आवर्जून पाहतात. एकापेक्षा एक सुपरङुपरहिट फिल्म्स करणाऱ्या या अभिनेत्रींनी त्या काळात सर्वांच्या हृदयात आपली एक विशिष्ट छाप उमटवली होती.

या अभिनेत्रींमधील एक अभिनेत्री राखी आहे. गोरापान रंग, गोल चेहरा आणि हरणी सारखे सुंदर मोठे-मोठे ङोळे असलेल्या या अदाकारी अभिनेत्रींची ज्वानी सिल्वर स्क्रीन वर खूपच प्रसिद्धीत होती. ही अभिनेत्री आज 73 वर्षांची झाली आहे.

राखीचा जन्म 15 ऑगस्ट 1947 ला वेस्ट बंगाल मध्ये राणाघाट येथे झाला. राखीने आपल्या वयाच्या अगदी 20 व्या वयापासूनच चित्रपट सृष्टीमध्ये ङेब्यू करण्यास सुरुवात केली होती. राजश्री प्रोडक्शनच्या “जीवन मृ’त्यु” या चित्रपटातून राखीने बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली. या चित्रपटातूनच राखीला खूप चांगल्याप्रकारे सक्सेस मिळाले होते.

या अभिनेत्रीला चित्रपटांत कुणी पाहिले नाही, असे कुणीही नाही. तुम्हांला माहित आहे का? राखीने प्रत्येक चित्रपटांत वेगवेगळ्या अनेक भूमिका केल्या आहेत. परंतु तिला आपण सर्वांत जास्त आई आणि आजींच्या भूमिकेतून पाहिले आहे. आता सध्या राखी आपल्या वयोमानानुसार कोणत्याही चित्रपटांत काम करताना दिसत नाही. ती सध्या मुंबई पासून दूर असलेल्या पनवेल येथील आपल्या फार्महाउस मध्ये राहते.

चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची कमाल दाखवून चाहत्यांच्या हृदयावर वार करणाऱ्या राखीला निसर्ग सानिध्यात राहायला खूप आवडते. आपली ही अभिनेत्री सध्या पुर्णपणे शेतकरी बनली आहे. रिपोर्टस् च्या अनुसार ही अभिनेत्री सध्या जास्तीत जास्त वेळ आपल्या फार्महाउस मध्येच घालवते. इतकचं नव्हे, तर बरेच पाळीव प्राणी
देखील तिने पाळले आहेत व ती त्यांचा सांभाळही खूप छान प्रकारे करते.

राखी गुलजारची मुलगी मेघना गुलजार हिने आपल्या आईविषयी सांगितले की, आईला शेतात काम करणे, विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन करणे हे भरपूर आवडते. मेघना ने एक विशेष गोष्ट आपल्या अभिनेत्री आईविषयी सांगितले, आपल्या आईला मुंबईतील ते धावपळीचे जीवन, प्रदूषण आणि सतत सुरू असलेले ते मुंबईचे तुडुंब ट्राफिक हे सगळे मुळीच आवडत नाही. यासाठी आईने शहरापासून दूर शांत असे निसर्गरम्य वातावरणात राहणे ठरविले.

“करण- अर्जुन” या चित्रपटातून आईची अप्रतिम भूमिका रेखाटून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेल्या या अभिनेत्रीचा “क्लासमेट” हा शेवटचा चित्रपट होता. परंतु आता राखी काही महत्त्वाच्या इव्हेंट मध्येच नजरेस येते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.