Rajan Marathi Movie : Rakesh Bapat घेऊन येतोय राजनचा थरार

1980
राकेश बापट घेऊन येतोय राजनचा थरार 
भरत सुनंदा लिखित आणि दिग्दर्शित Rajan ‘राजन’ या सिनेमाचा वाँँटेड नाव असलेला टीजर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ‘राजन’ नावाचा दबदबा असलेला हा टीजर पोस्टर त्यामुळे चांगलाच चर्चेत आला असून. मराठी सिल्वर स्क्रीनवरील राजनची भूमिका कोण करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.. प्रेक्षकांना पडलेल्या या प्रश्नाचा लवकरच उलगडा होणार आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मराठी आणि हिंदीचा देखणा अभिनेता राकेश बापट या सिनेमात राजनची भूमिका साकारणार असल्याचे समजते. हिंदीत विशेष ओळख निर्माण करणाऱ्या राकेशने मराठीतही आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.
‘रिदम मुव्हीज प्रस्तुत वंश एंटरप्राईजेस यांची निर्मिती असलेला हा सिनेमा ‘राजन’ या नावामुळेच अधिक चर्चेत आला आहे. मात्र, हा सिनेमा कोणत्या व्यक्तिगत आयुष्यावर बेतलेला नसून तत्कालीन काळातील गुंडागिरीवर हा सिनेमा भाष्य करणारा आहे. Rajan ‘राजन’ या सिनेमाचे वामन पाटील, दिप्ती बनसोडे आणि सुरेखा पाटील यांनी निर्मिती केली असून,तुषार पटेल यांनी कार्यकारी निर्मात्याची भूमिका पार पाडली आहे. राकेश बापट ‘राजन’ च्या भूमिकेत कसा दिसेल, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेल.