Loading...

नवनव्या संकल्पना असणाऱ्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणारी मराठी वाहिनी ‘झी युवा’, प्रेक्षकांची सर्वाधिक लाडकी वाहिनी आहे. उत्तमोत्तम मालिकांच्या बरोबरीनेच अनेक उत्कृष्ट कार्यक्रम सुद्धा ‘झी युवा’च्या माध्यमातून पाहायला मिळतात. तरुणांच्या दैदिप्यमान कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, गेली तीन वर्षे ‘झी युवा सन्मान’ हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या युवा पिढीतील आदर्श व्यक्तींचा सन्मान या सोहळयात केला जातो. काही विशेष पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येतात.
Loading...

Loading...

यंदाही हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.’एशियन गेम्स’मध्ये ‘रायफल शूटिंग’ या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळवणारी राही सरनोबत ही यातीलच एक गुणवान व्यक्ती आहे. या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. महाराष्टातील कोल्हापूर भागातील या खेळाडूने, २००८ साली पुण्यात पार पडलेल्या ‘कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये पहिल्यांदा सुवर्णपदकाची कमाई केली होती. २५ मीटर रायफल शूटिंगमधील निपुण खेळाडू असणाऱ्या राहीची आदर्श आहे, ती ५० मीटर रायफल शूटिंग प्रकारातील महाराष्ट्रातील आणखी एक गुणवान तेजस्विनी सावंत! राही सरनोबत या आदर्श खेळाडूचा सन्मान करणे अत्यंत अभिमानाची बाब आहे. ‘झी युवा सन्मान’ सोहळ्यात ‘युवा क्रीडा सन्मान’ हा पुरस्कार देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
Loading...

या पुरस्काराच्या बरोबरीने, इतरही अनेक पुरस्कार देण्यात आले. सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील पुरस्कार सुद्धा या सोहळ्यात प्रदान करण्यात आले आहेत. सारंग गोसावी यांना ‘सामाजिक जाणीव सन्मान’, अक्षय बोरकर यांना ‘उद्योजक सन्मान’, सारंग नेरकर यांना ‘संशोधक सन्मान’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. याशिवाय ‘कला सन्मान’चा मान अभिनेता आदिनाथ कोठारे याला, ‘संगीत सन्मान’चा मान गुणी गायक जसराज जोशी याला, ‘डिजिटल कला सन्मान’ हा पुरस्कार सारंग साठ्ये याला मिळाला. ‘युवा साहित्य सन्मान’ पुरस्काराचा मान मनस्विनी लता रवींद्र हिला मिळाला तर, डॉ. आरती बंग यांना ‘युवा संजीवनी सन्मान’ व ‘एनडीआरएफ’ला ‘युवा अलौकिक योगदान सन्मान’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्रातील गुणवान युवांचा हा भव्यदिव्य सन्मानसोहळा पाहायला विसरू नका, ‘झी युवा’ वाहिनीवर, रविवार १३ ऑक्टोबर रोजी, दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता!!!
Loading...