राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतील कलाकारांची ऑफ स्क्रीन धम्माल मस्ती !

कलर्स मराठीवर नुकतीच सुरु झालेली ‘राधा प्रेम रंगी रंगली” ही मालिका प्रेक्षकांना आवडत असून मालिकेतील प्रेमची भूमिका साकारणारा सचित पाटील याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. प्रेमचा मालिकेतील लुक, त्याचं, चालण, बोलणं, सगळचं प्रेक्षकांना भावतं आहे. मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांना मालिकेमध्ये वेगवेगळ्या घटना बघायला मिळत आहेत. अन्विताचं गरोदर असणं नंतर ते प्रेमला कळणं, मंडपातून अचानक विशालच गायब होणं, राधाचं लग्न प्रेमबरोबर होणं या सगळ्याच घटनांनी मालिकेला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या घटनांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. हे सगळ होत असतानाचं मालिकेमध्ये अजून एक ट्वीस्ट आला जेंव्हा दीपिकाने प्रेमला एक अट घातली आणि कागदपत्रांवर प्रेमचे हस्ताक्षर देखील घेतले. आता, पुढे मालिकेमध्ये काय होणार ? अन्विताच खरं घरच्यांना कळणार का ? राधा प्रेमचे मनं कसं जिंकणार ? प्रेम राधाच्या प्रेमात पडणार का ? दोघांमध्ये कुठलं नवं नातं सुरु होणार हे बघणे रंजक असणार आहे.

शुटींगच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ मिळाला कि, मालिकेतील कलाकार भरपूर वेळ एकत्र घालवतात. सेटवर सेल्फी काढणं, गप्पा गोष्टी करणं तसेच वेगवेगळ्या विषयावरच्या चर्चा सुरु असतात. याचवेळेस क्लिक केलेला फोटो ज्यामध्ये कलाकारांचं बॉन्डीग दिसून येत आहे. प्रेम, राधा, श्रावणी काकू आणि दीपिका यांनी सेटवर काही फोटोज क्लिक केले. सगळ्यांचीच सेटवर बरीच धम्माल मस्ती सुरु असते त्यामधील हा एक क्षण.