मराठी कलाकाराच्या अदाकारीने  रंगला

झी युवाचा ‘पुणे महोत्सव’

 संगीत, नृत्य, कला, गायन, वादन यांचा मिलाफ असलेला ‘पुणे महोत्सव’ ७ सप्टेंबर २०१७ ला दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता झी युवावरपहायला मिळणार आहे. मराठी इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकारांच्या परफॉर्मन्स या कार्यक्रमात आहेत. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, संस्कृतीबालगुडे, सागर कारंडे , विशाखा सुभेदार , समीर चौगुले , मिलिंद शिंतरे , विजय पटवर्धन , मयुरेश पेम , प्राजक्ता माळी , तेजस बर्वे , ज्ञानदा रामतीर्थकर , रेशम प्रशांतआणि संगीत सम्राटाचे स्पर्धक पुणे महोत्सवात स्वतःची कला सादर करणार आहेत . प्रेक्षकांचा रविवार मनोरंजित करण्यासाठीच झी युवा ही वाहिनी ‘पुणे महोत्सव ‘हाएक अतिशय उत्तम दर्जाचा कार्यक्रम घेऊन आलेली आहे.

झी युवा च्या ‘पुणे महोत्सव’ चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या महोत्सवाच्या निमित्ताने झी युवा खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान करणार आहे. ५गुणवान युवतींचा ज्यांनी त्यांच्या आयुष्यात स्व कर्तृत्वावर स्वतःचे नाव कमावले अश्या प्रणिती शिंदे (तरुण महिला राजकारणी), पूर्वा बर्वे ( बॅडमिंटन प्लेअर ) , गौरीगाडगीळ ( कलाकार ), ऋतुजा केकावळे ( विद्यार्थी ), कृष्णा पाटील ( एव्हरेस्टवीर महिला गिर्यारोहक ) यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे . रविवार १७ सप्टेंबर २०१७ ला दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता, झी युवावर मराठी कलाकाराच्या अदाकारीने रंगलेला आणि महाराष्ट्रातील गुणवान युवतींचा सन्मानसोहळा पाहण्यासाठी पुणे महोत्सव हा कार्यक्रम पहायला विसरू नका.