Priyadarshan Jadhav The Hosting Chala Hawa Yeu Dya

Priyadarshan Jadhav The Hosting  Chala Hawa Yeu Dya

प्रियदर्शन घेणार निलेश साबळेची जागा

Dr Nilesh Sable डॉ. नीलेश साबळे सध्या काही दिवस Chala Hawa Yeu Dya ‘चला हवा येऊ द्या’ पासून दूर राहणार असून त्याची प्रकृती बिघडली असल्या कारणाने कमीतकमी महिनाभर तरी नीलेशला चित्रीकरणात सहभाग घेता येणार नसल्याने काही भागांपुरती शोचे सूत्रसंचालन अभिनेता प्रियदर्शन जाधवकडे देण्यात आले आहे.

 

प्रेक्षकांसमोर गेले तीन वर्षे सातत्याने अत्यंत रंजक पद्धतीने ‘चला हवा येऊ द्या’ हा शो डॉ. नीलेश साबळे आणि त्यांची टीम सादर करत आहे. नीलेश या तीन वर्षांत पहिल्यांदाच काही भागांपुरता का होईना शोपासून दूर असणार आहे. त्याची प्रकृती गेले काही दिवस बिघडलेली होती. त्याचे उपचार सुरू असले तरी डॉक्टरांनी काही आठवडे त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितली आहे.

 

या शोचे सूत्रसंचालन करण्याची Time pass 2 ‘टाईमपास २’ फेम प्रियदर्शन जाधव स्वत: विनोदी अभिनेता, लेखक असल्याने त्याच्यावर काही भागांपुरते जबाबदारी देण्यात आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा शो पूर्णपणे नीलेशचा आहे. सध्या त्याची प्रकृती बरी नसल्याने मला काही भाग करण्यासाठी विचारणा झाली. काही भागांसाठी मी काम करणार असल्याने अजिबात दडपण घेणार नाही. पण मुळात मी सूत्रसंचलन फारसे केलेले नसल्याने प्रत्येक भाग चांगला होईल ही जबाबदारी असल्याचे प्रियदर्शनने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here