वेब विश्वात सक्रीय असलेल्या प्राइम फ्लिक्सने आता चित्रपट प्रस्तुतीमध्ये पदार्पण केलं आहे. “तत्ताड” हा चित्रपट प्राइम फ्लिक्सद्वारे प्रस्तूत केला जात असून, २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पेंडिंग लव्ह, भाडखाऊ, ठरकीस्तान, घोस्ट लीला अशा वेब सीरिजची निर्मिती प्राइम प्लिक्सनं केली आहे. या वेब सीरिजना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही लाभला आहे. त्यामुळे आता पुढचं पाऊल टाकत प्राइम फ्लिक्स चित्रपट निर्मिती क्षेत्रात दाखल होत आहे. मराठी चित्रपट हा सध्याचा ‘बझ वर्ड’ आहे. अनेक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहेत, अनेक चित्रपट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गाजत आहेत. अशा उत्तमोत्तम चित्रपटांना प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याचं काम प्राइम फ्लिक्सद्वारे केलं जाणार आहे.

अतिशय आगळंवेगळं नाव असलेला “तत्ताड” हा प्राइम फ्लिक्स प्रस्तुत करत असलेला पहिला चित्रपट ठरणार आहे. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, चित्रपटातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. चित्रपटाच लेखन आणि दिग्दर्शन राहुल गौतम ओव्हाळ यांनी केलं आहे. राकेश भोसले, सुशील देशपांडे आणि प्रितम म्हेत्रे चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यामुळे वेगळं नाव असलेल्या या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यात आता प्राइम फ्लिक्सकडून हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार असल्याने हा दुग्धशर्करा योगच ठरणार आहे.