मंडळी, गेल्या काही आठवड्यांपासून ‘आटपाडी नाईट्स’ सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढताना दिसत आहे. अंगानं बारीक असलेला मजनू आणि मजनूच्या बॉडीची नाय तर मनाची ताकद ओळखणारी लैला. अशी ही आटपाडीची लैला मजनूची जोडी सोशल मिडीयावर तुफान चर्चेत येताना दिसतेय.

काही दिवसांपूवी ‘आटपाडी नाईट्स’ सिनेमाचा टीझर आपल्या भेटीस आला. टीझरमधून आपल्यला कळल की मजनूचा रात्रीचा काय घोळ आहे. सोशल मिडीयावर टीझरला मिळणारा रिस्पॉन्स पाहता प्रेक्षकांना ह्या सिनेमाची ओढ लागली आहे अस दिसतय. मोशन पोस्टरच्या माध्यमातून झंगाट जुळल्यावर सल्ले देणारा आटपाडीचा DVD,पोरांच्या मनातली पोरींची BEAUTY ओळखणारी बबिता देखने (बिवटी पार्लरवाली), भावनेच्या भरात वाहत जाणारा जितु बलकवडे, रात्रीच्या घोळावर उपाय शोधणारा आबा माने ह्या सगळ्या लक्ष्यवेधी भूमिकांशी आपली ओळख झाली. नितीन सिंधुविजय सुपेकर लिखित दिग्दर्शित ‘आटपाडी नाईट्स’ ह्या सिनेमात प्रक्नाव रावराणे आणि

आटपाडीच्या ह्या लैला (सायली संजीव) आणि मजनू (प्रणव रावराणे) यांच्या धमाल लव्हस्टोरीवर आधारित एक गान रिलीज करण्यात आलं. ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ अस ह्या गाण्याचं आकर्षक नाव आहे. आटपाडीच्या अतरंगी लैला मजनूच्या अतीव प्रेम दाखवणारं एक गान सिनेमात असायला पाहिजे अस दिग्दर्शक नितीन सुपेकर यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे हे सुंदर अस गान तयार झालं.

गाण्याचे बोल सुंदर अशा खेड्यात फेरफटका मारून आणतात असंच काहीस वाटत.  तर गाण्याचं संगीत ताला सुरांमध्ये अंग थिरकायला भाग पाडतात.  ‘प्रेमाचा जांगडगुत्ता गं, जीव झाला खलबत्ता गं’ गावरान बाज असणाऱ्या गाण्यात आटपाडीच्या लैला मजनूचा डान्स भुरळ पाडून जातो.  रंगेबेरंगी मनमोहक व्हिडिओमध्ये लैला म्हणजे सायली संजीवची अदाकारी, चेहऱ्यावरील दिलखेचक हास्य, भाव तिचा गाण्यातले हावभाव तिच्यावर फिदा होण्यास भाग पाडतात.

गावरान बाज असलेल्या शब्दांना गावरान, कात्तील, तडफदार असाच आवाज ह्या गाण्याला आहे. आदर्श शिंदे यांनी ह्या गाण्याला स्वरबद्ध करून चार चांद लावले अस म्हंटल तर वावग ठरणार नाही. तर ह्या गाण्याला शब्दबद्ध केले आहे नारायण पुरी. आणि विजय गवांडे यांच्या संगीतातून साकार झालं ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’.

गाण्याचा व्हिडिओ पूर्णतः दाक्षिणात्य सिनेमाप्रमाणे वाटतो. तर मंडळी आटपाडीच्या लैला मजनूच्या प्रेमावर आधारित हे गान ऐकलं नसेल तर एकदा जरूर ऐका.

नितीन सिंधुविजय सुपेकर लिखित दिग्दर्शित ‘आटपाडी नाईट्स’ ह्या सिनेमात प्रणव रावराणे आणि सायली संजीव ह्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

‘आटपाडी नाईट्स’ हा सिनेमा २७ डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पहायला विसरू नका….

BollyWood Movies Download Link