देऊळ बंद पासून मुळशी पॅटर्न पर्यँत स्वतःचा नवीन पॅटर्न निर्माण करणारा अभिनेता,लेखक,दिग्दर्शक म्हणजे प्रवीण तरडे. गावाकडचा रांगडी बाणा आणि आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकेने आणि स्टाईल ने प्रसिद्ध झालेला प्रवीण तरडे यांचा आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रसिद्ध झाले. समाज माध्यमातून पोस्टर ला पसंती मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ चित्रपटातून मांडताना शिवकाळातील महत्वाची व्यक्ती म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं गाव तळबीड म्हणजे आजच्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील. आता चित्रपटातून हंबीरराव मोहिते यांचा जीवनपट धगधगता अग्निकुंड मांडतोय ज्याची नाळ साताऱ्याशी जुळलेली आहे असा अभिनेता,लेखक,दिग्दर्शक प्रवीण तरडे.

प्रायोगिक रंगभूमी ची सुरवात साताऱ्यासारख्या शहरातूनच झाली. सुधीर कुलकर्णी,सयाजी शिंदे,तुषार भद्रे, किरण माने अशा साताऱ्यातील कलावंताच्या सोबतीने तरडे यांचा प्रायोगिक रंगभूमीवरील कामास सुरवात झाली. मला साताऱ्याने खूप काही दिले. येथील मित्र,कलावंत यांनी सदैव माझ्यावर भरपूर प्रेम केलं आहे. प्रवीण तरडे यांचे साताऱ्याशी जुळलेले नाते पुन्हा एकदा दिसणार आहे.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जीवनपट मांडताना तो साताऱ्याशी अजून जवळ आला आहे. जेव्हा प्रायोगिक रंगभूमीची सुरवात केली तेव्हापासून साताऱ्याचा माझ्या यशात बहुमोल वाटा आहे असेही प्रवीण यावेळी आवर्जून सांगतो. आपला रांगडी बाणा जपणारा,सामान्य घरातून पुढे आलेला कलावंत मातीशी जुळलेला आहे. आणि म्हणूनच याच मातीतील सरसेनापती हंबीरराव मोहितेंचा जीवनपट तो घेऊन येतोय.