मंडळी, आज आपण अशा व्यक्तीबद्दल वाचणार आहात ज्याचं लेखन खतरनाक आहे, ज्याचा अभिनय खतरनाक आहे, ज्याचं दिग्दर्शन खतरनाक आहे, ज्याचा आवाज खतरनाक आहे पण मन दिलदार आहे. तुमच्या लक्षात आलाच असेल मी कुणाबद्दल बोलतोय.’आरे भाऊ आहे तू माझा’ तुला कळणारच ना कुणाबद्दल बोलतोय. ज्यांनी महाराष्ट्राला गुन्हेगारीचे तीन महत्वाचे नियम सांगितले. ह्या माणसाच्या सहवासात काही वेळ घालवला तर नकळत माणूस म्हणून कस जगावं ह्याचेही नियम माहीत होतात. अररारारारा अररारारारा खतरनाक प्रवीण तरडे. अवघे काही मराठी सिनेमे काढून बॉलिवूडलाही मराठी मातीतल्या विषयांची भूरळ पडलीये. प्रवीण तरडे यांनी आजवर केलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहील्या. त्याचा रेगे असो देऊळबंद असो किंवा आत्ताच मुळशी पॅटर्न, मातीतला विषय पडद्यावर मांडण्याच्या शैलीमुळे आज प्रवीण तरडे यांचा मराठी सिनेसृष्टीत एक वेगळाच पॅटर्न आहे.

मुळशी पॅटर्न ह्या सिनेमाला तर संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. लहान मुलांपासून शेतकरी आजी आजोबा यांच्या मनात घर केलं मुळशी पॅटर्नने. मुळशी पॅटर्न मधली नन्या भाई ही भूमिका सगळ्यांच्या मनात घर करून गेली. मंडळी, प्रवीण तरडे यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. तरडे यांना नन्या भाई मध्ये बघितलं तस आत्ता इन्स्पेक्टरच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत. ट्रिपल सीट ह्या सिनेमात तरडे इन्स्पेक्टर दिवाने ही भूमिका साकारत आहेत. ट्रिपलच्या आकर्षक पोस्टरने सोशिअल मीडियावर सिनेमाची उत्सुकता वाढवली आहे. नुकताच इन्स्पेक्टर दिवाने विशेष ट्रिपल सीटच मोशन पोश्टर रिलीज करण्यात आलं.

हाताची मूठ आवळलेली, चेहऱ्यावर संयमित भाव, एका हातात काठी, पिळदार मिशा असा सगळा लुक सिनेमाबद्दल कमालीची उत्सुकता वाढवतोय. रेगे सिनेमात त्यांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती मात्र ट्रिपल सीट मधला इन्स्पेक्टर भाऊराव दिवाने पडद्यावर बघणे औत्सुक्याचा विषय आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फील कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट’ गोष्ट वायरलेस प्रेमाची हा सिनेमा येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. ह्या सिनेमाचे दिग्दर्शन संकेत पावसे यांनी तर निर्मितीची जबाबदारी नरेंद्र शांतिकुमार फिरोदिया यांनी पार पडली आहे.ऐन दिवाळीत अशा तगड्या स्टारकास्ट असलेला सिनेमा प्रेक्षकांची मनोरंजनाची दिवाळी करणार यात शंका नाही. मंडळी, येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला जवळच्या थिएटरमध्ये ट्रिपल सीट बघायला विसरू नका….