Prarthana Behere Gets Engaged TO Director Abhishek Jawkar

2346
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

एकीकडे मनोरंजनसृष्टीतील देखणी आणि हसमुख अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या लग्नाची चर्चा चालू असताना दुसरीकडे स्वत: प्रार्थनाने तिच्या साखरपुडा झाल्याची बातमी सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे. ऑगस्टमध्ये साखरपुडा आणि नोव्हेंबरमध्ये लग्न हे प्रार्थनाने ठरवलेलंच होते.

प्रार्थनाच्या साखरपुड्याच्या पोस्टमध्ये प्रार्थना आणि तिचा लाईफ पार्टनर अभिषेक जावकर यांचा एकत्र फोटो पाहून ‘एकमेकांना शोभून दिसताय’ या प्रकारच्या अनेक कमेंट्स तिच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित झाल्या असतील.

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत प्रार्थनाने अभिनय केला आहे आणि त्यामुळेच तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे आणि तिच्या चाहत्यांनी तिला सोशल मिडीयावर भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Prarthana Behere Gets Engaged TO Abhishek Jawkar Photos