मित्रांनो!, सन २०१२ साली प्रदर्शित झालेला चिंटू आणि त्यानंतर २०१३ साली चिंटू 2 हे मराठीतील चित्रपट बालगोपालांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले होते. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे गीतकार व दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांचे हे दोन्ही चित्रपट होते. या दोन्ही चित्रपटांत चिंटू आणि त्यांच्या मित्राच्या करामती प्रेक्षकांना पहायला मिळाल्या होत्या.

या दोन्ही चित्रपटात नेहाची भूमिका साकारणारी बाल कलाकार आठवतेय का?… ती होती “रुमानी खरे”. आता या दोन्ही चित्रपटाला जवळपास १० वर्षे झाली आहेत. आणि विशेष म्हणजे त्यातील हीच नेहा आता एक उत्तम अभिनेत्री झाली असून दरम्यानच्या काळात तीने कथ्थक या शास्त्रीय नृत्य प्रकारात देखील प्राविण्य मिळविले आहे.

रुमानी खरे हीने अभिनव विद्यालय तसेच एस पी कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केलेले असून. अभिनयासोबतच कथ्थक नृत्याची देखील ती सराव करत असते. २०१२ सालच्या “चिंटू” या मराठी चित्रपटातून तीने अभिनय क्षेत्रात पाहिले पॉल टाकलेले होते. त्यापाठोपाठ त्याचाच पुढील भाग चिंटू 2 या आणखी एका चित्रपटांत तिने तीच नेहाची भूमिका साकारली.

दरम्यानच्या कालावधीत बालभारतीने एक डॉक्युड्रामा सादर केलेला होता त्यात रुमानीला देखील काम करण्याची संधी मिळाली होती. बालभारतीचा आजवरचा प्रेरक इतिहास आणि केलेली प्रगती आजकालच्या या नव्या पिढीला समजावी म्हणून हा डॉक्युड्रामा बनवण्यात आला होता. त्यानंतर सन २०१९ साली “आई पण बाबा पण” हे मस्त नाटक रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. यामध्ये रुमानी खरे महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. रुमानीने कॉलेजमध्ये असताना सुद्धा अनेक एकांकिका व नाटकांतून विविधरंगी भूमिका साकारल्या आहेत.

पण मित्रांनो!, तुम्हाला हे माहिती आहे का, की ही रुमानी खरे प्रत्यक्षात मराठीतील सुप्रसिद्ध कवी, गायक “संदीप खरे” यांची मुलगी आहे. सर्वांना सुपरिचित असा “आयुष्यावर बोलू काही” हा त्यांचा काव्यगीतांचा संग्रह विशेष प्रसिद्ध आहे. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या जोडीने एकत्रित पणे जगभरातील अनेक ठिकाणच्या रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अग्गोबाई ढग्गोबाई, कधी हे कधी ते, तुझ्यावरच्या कविता, आरसपानी हे त्यांचे कविता संग्रह सुप्रसिद्ध आहेत.

आयुष्यावर बोलू काही हा त्यांचा कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुप्रसिद्ध मराठी कवी, गीतकार वैभव जोशी सोबत ‘इर्शाद’ हा कार्यक्रम तसेच ‘आतला कप्पा’ हा त्यांचा कार्यक्रम त्यांनी रसिक प्रेक्षकांसाठी सादर केलेला आहे… करत आहेत. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे संदीप खरे हे अगदी बालवयात म्हणजे थेट ४ थ्या इयत्तेत असल्यापासूनच कविता बनवायचे आणि आज आपण त्यांच्या कार्यक्रमाचे हाऊसफुलचे बोर्ड पाहत असतो.

संदीप खरे यांच्या पत्नीचे नाव सोनिया खरे असून सोनियाजी नेहमीच आपल्या लेकीला म्हणजेच रुमानीच्या कलागुणांना वाव आणि प्रोत्साहन देत असतात. तिला ज्या क्षेत्राची आवड आहे त्यातच तिने आपले करिअर करावे असे त्यांना मनापासून वाटते. रुमानीने सध्या आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि ती दिसायलाही अतिशय सुंदर आहे. रुमानी इंस्टाग्रामवर सतत ऍक्टिव्ह असून आपल्या नृत्याची आवड ती नेहमीच आपल्या फॅन्ससोबत शेअर करताना दिसते. आपले अभिनय आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर येणाऱ्या भविष्यात ती सिनेसृष्टीत किंवा टेलिव्हिजन, ओटीटी मालिकेतून मुख्य नायिका म्हणून रसिकांच्या भेटीला यावी. या सादिच्छेसह रुमानीला हार्दिक शुभेच्छा!!!