Phulpakharu – ‘फुलपाखरू’चा नायक बनला गायक!!!

1090

‘फुलपाखरू’ चा नायक बनला गायक!!!

मालिकेतील कलाकार केवळ अभिनयातच अडकडून न राहता नवनवीन गोष्टी शिकण्याच्या आणि करण्याच्या प्रयत्नात असतात. कोणी दिग्दर्शन,छायांकन तर कोणी फोटोग्राफी किंवा चित्र काढून अभिनयाव्यतिरिक्त असणारे कलागुण जोपासत असतात. असाच एक नवीन गुण प्रेक्षकांसमोर आणला आहे झी युवाच्या Phulpakharu  ‘फुलपाखरू’ मालिकेतील मानस म्हणजेच यशोमान आपटे याने. अभिनयासोबतच आता स्वतःच्या मालिकेसाठी एक गाणं गात गायक यशोमान प्रेक्षकांच्या समोर आला आहे. मालिकेत मानस-वैदेही यांच्यासाठी एक रोमँटिक गाणं कंपोज केलं असून यशोमानने स्वतःसाठी प्लेबॅक केलं आहे. सिनेमात अनेकदा हिरोने स्वतःसाठी प्लेबॅक केल्याचं आपण बघितलं आहे. पण मालिकेसाठी मात्र असं अपवादानेच घडतं.मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात यशोमान आपटेने आपली छाप पाडली आहेच. डहाणूकर कॉलेजमधून बीकॉम झालेल्या यशोमानने यापूर्वी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत आपली दखल घ्यायला भाग पडले आहे. झी युवा  वाहिनीने  या युवा टॅलेंटला हेरून आपल्या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर आणले.

सध्या  ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. यशोमान साकारत  मानस या तरुणाईच्या मनात घर केले आहे . झी युवामुळे यशोमानच्या सोशल मीडिया फॅन फॉलोअर्समध्येही कमालीची वाढ झालीय. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे यशोमनने काहीतरी खास करण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेत शूट होणाऱ्या एका गाण्यासाठी गायचं ठरवलं.

गायिका कीर्ती किल्लेदारसोबत गाण्याची संधी यशोमानला मिळाली. विशाल-जगदीश या संगीतकार जोडीने गाणं संगीतबद्ध केलं आहे. यशोमानचा गाण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. याबद्दल यशोमान  म्हणाला, ‘मला गाणी ऐकायला आणि गुणगुणायला आवडतात.

पण असा प्रयत्न आपण कधी करू शकतो असं वाटलं नव्हतं. मला प्रयोगशील राहायला आवडतं. त्यामुळे गाण्याचा हा देखील प्रयत्न मी करून पहिला. यासाठी मला माझी सहगायिका कीर्ती किल्लेदारची खूप मदत झाली. तिने माझ्याकडून गाऊन घेतलं असंच मी म्हणेन.’


Phulpakharu Serial Hruta Durgule & Yashoman Apte Photos