- Movie : Photocopy (2016) | फोटोकॉपी
- Producer : Akash Rajpal, Neha Rajpal
- Directer : Vijay maurya
- Studio : Neha Rajpal Productions
- Star Cast : Chetan Chitnis, Parna Pethe, Vandana Gupte, Dr.Girish Oak, Jaywant Wadkar, Anshuman Joshi, Manmeet Pem, Aashay Kulkarni
Photocopy Marathi Movie Review
प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये विविध विषय हाताळले जात आहेत. विविध पठडीतील सिनेमे हा मराठी सिनेमाचा मुख्य आकर्षण बिंदू आहे असे म्हणायला हरकत नाही. या आठवड्यात प्रदर्शित होणा-या मराठी चित्रपटांपैकी ‘फोटोकॉपी’ हा एक वेगळ्या पठडीचा चित्रपट आहे.
Photocopy (2016) Marathi Movie Mp3 Song Free Download
जुळी मुले आणि त्यांच्या आयुष्यात होणा-या घडामोडी तसेच त्यांची स्वत:ची लाईफस्टाईल या गोष्टींवर ‘फोटोकॉपी’ हा चित्रपट भाष्य करतो. जुळी मुलं असली तरी त्यांचे विचार मात्र भिन्न असू शकतात, हेच आपल्याला या चित्रपटातून अनुभवयाला मिळणार आहे.
‘फोटोकॉपी’ या चित्रपटाची गोष्टीतील प्रमुख जुळी पात्र म्हणजे मधू आणि माला (पर्ण पेठे).मधू, माला आणि आजी (वंदना गुप्ते) असे यांचे कुटुंब असते. या दोन जुळ्या बहिणी आहेत पण या दोघींचं कधीच एकमेंकाशी पटत नाही अर्थात ते पटवून घेतच नाही. दोघींच्या विचारांमध्ये, राहणीमानामध्ये बराचसा बदल असतो. मधू ही बिनधास्त आहे तर माला भोळी आणि श्रध्दाळू. मालाची ‘गणू’ वर (गणपती बाप्पा) फार श्रध्दा असते आणि मधूला फक्त लाईफ कूल पध्दतीने एन्जॉय कसं करावं एवढंच माहित असते.
पण आयुष्याच्या वाटेवर कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या मदतीची गरज तर लागतेच ना, मग तो मदतीचा हात मित्रांचा असो किंवा एकमेंकांशी न पटणा-या जुळ्या बहिणींचा असो.
कॉलेजमधील एका कॉम्पिटीशनमध्ये मधूचे सिलेक्शन होते आणि यासाठी तिला मालाच्या मदतीची गरज असते. शेवटी आपलीच बहिण आणि काही अटी मान्य करुन माला मधूची मदत करायला तयार होते. या कॉम्पिटीशनमध्ये हिरोची एण्ट्री होते म्हणजेच जुळ्या बहिणींच्या गोंधळून टाकणा-या या चेह-यांमध्ये समीर वानखेडेची (चेतन चिटणीस) एंण्ट्री होते.
कॉम्पिटीशनच्या दरम्यान माला आणि समीरची मैत्री होते आणि मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात होते. परंतू मधूच्या गेट अप मध्ये माला आहे हे फक्त मधू आणि माला यांनाच माहित असते आणि समीर मालाला मधू समजत असतो. पण शेवटी समीर कोणाशी लग्न करतो? माला की मधू? माला आणि मधू कधीपर्यंत समीरसमोर स्वत:ची ओळख लपवून ठेवणार?
हे सर्वकाही लगेच कळणे इतके सोपे नाही कारण शेवटी ही फोटोकॉपी म्हणजेच जुळ्या बहिणींची गोष्ट आहे ना… तुमच्या गोंधळलेल्या मनाला अचूक उत्तर देण्यासाठी ‘फोटोकॉपी’ हा चित्रपट नक्की, आवर्जून पाहा.
चित्रपटा दरम्यान प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करणे आणि उत्सुकता वाढणे याचं संपूर्ण श्रेय या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला जाते. विजय मौर्या हे नाव आपण खूप वेळा ऐकले आहे. या चित्रपटाला दिग्दर्शक विजय मौर्या यांनी उत्तमरित्या मांडले आहे. या कथेत जुळ्या बहिणी, पहिलं प्रेम, कॉलेजमधील तरुणांचा उत्साह, तरुण वयात एकमेकांच्या चांगल्यासाठी मनाविरुध्द एखादं पाऊल उचलणं यांसारख्या अनेक गोष्टी अतिशय सुंदररित्या दाखवण्यात आल्या आहेत.
अभिनेत्री पर्ण पेठेनी जुळ्या बहिणींची भूमिका साकारताना विशेष मेहनत घेतली आहे असे पडद्यावर दिसून येते. अभिनेता चेतन चिटणीस याचा हा पहिलाच मराठी सिनेमा, पण त्याच्या अभिनयामध्ये नवखेपणा दिसून आला नाही. विशेष म्हणजे पर्ण आणि चेतन यांच्या कवितेंनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन त्यांच्या अभिनयाकडेच पाहत राहायला भाग पाडतील. निर्माते डॉ. नेहा राजपाल आणि आकाश राजपाल यांचे पण विशेष कौतुक केले पाहिजे कारण या चित्रपटात त्यांचा पण मोलाचा वाटा आहे.
संगीत क्षेत्रातील निलेश मोहरिर, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, नेहा राजपाल, वैशाली सामंत, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे या सर्व कलाकारांना खरंच हॅट्स ऑफ! कलाकाराच्या संगीतानी, आवाजांनी आणि शब्दांनी सतत पर्ण आणि चेतनच्या प्रेमात पाडले. एक अन् एक भावना या चित्रपटांतील गाण्यांतून व्यक्त होता.
अंशुमन विचारे, आशय अनिल कुलकर्णी, कोमल राजपाठक, मनमित पेम आदी कलाकारांनी पण सुंदर अभिनय केला आहे.
प्रेक्षकहो, ‘फोटोकॉपी’ हा चित्रपट आता,तत्काळ, ताबडतोब प्रेक्षकगृहात पाहा कारण या चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांनी मनोरंजनाची मेजवाणी सादर केली आहे, तर आपण या मेजवाणीचा आनंद घ्यायलाच हवा.