बॉलीवुड इंडस्ट्रीमधील पॉप्युलर अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ही अगदी वयाच्या सातव्या वर्षीच या चंदेरी दुनियेत आली. तिच्या चित्रपटांनी फक्त चाहत्यांच्या हृदयावर जादू केली नाही तर उत्कृष्ट पुरस्कार देखील मिळवले. हल्ली पद्मिनी कोल्हापुरे हिचा एक जुना व्हिडिओ खूप जबरदस्त वायरल होत आहे. ज्यामध्ये ती कपिल शर्मा शो मध्ये बसलेली दिसत आहे.
या व्हिडिओ मध्ये कपिल शर्मा तिला इंङस्टीमधील अधिकाधिक प्रश्न विचारताना दिसत आहेत. तर पद्मिनी ह्या सुद्धा अगदी उत्सुकतेने सर्व प्रश्नांची छान उत्तरे देत आहेत. याच दरम्यान कपिल शर्मा याने म्हटले की, आम्ही अशी अफवा ऐकली होती की, टूटू शर्माने तुम्हांला पेमेंट दिले नव्हते, म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत लग्न केले.
कपिल शर्माच्या या प्रश्नाचे अगदी जबरदस्त अंदाजात त्यांनी उत्तर दिले. आपल्या पतीविषयी त्यांनी शो मध्ये म्हटले की, लग्न करून मी सर्वात आधी त्यांचा बदला घेतला, परंतु आता ते बदला घेत आहेत. पद्मिनी कोल्हापुरे ह्यांचे हे उत्तर ऐकून कपिल शर्मा आणि अर्चना पुरम सिंह ह्यांना स्वतःचे हसू आवरता आले नाही.
त्याचे झाले असे की, कपिल शर्मा शो मध्ये पद्मिनी कोल्हापुरे ह्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, “तुमच्याविषयी आम्ही एक अफवा ऐकली होती. जे खरे की खोटे हे तुम्हांला विचारायचे होते. “ऐसा प्यार कहाँ” या चित्रपटाचे निर्माते टूटू शर्मा हे होते. असे ऐकण्यात आले की, टूटू यांनी तुमचे पेमेंट दिले नव्हते, ज्यामुळे तुम्ही रागाने शेवटी त्यांच्याशीच लग्न केले.
त्यावर पद्मिनी कोल्हापुरे या म्हणाल्या की,”अगदी बरोबर आहे. ही अफवा नसून सत्य आहे. मी असा विचार केला होता की, त्यांच्यासोबत लग्न करते.” पद्मिनी हे सांगत असताना मध्येच अर्चना पुरम सिंह म्हणते की,”लग्न करून बदला घेतला तर…” पद्मिनी कोल्हापुरे म्हणतात की,”हो खरंच मी तर लग्न करून बदला घेतला आणि आता ते बदला घेत आहेत.” याव्यतिरिक्त पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितले की, “त्यांना गाण्याची खूप आवड होती. परंतु त्यांच्या आजीची ही इच्छा होती की, तिने अभिनेत्री व्हावे.”
आपल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितले की, फक्त 17-18 वय असताना त्यांनी आईची भूमिका साकारली होती. त्या म्हणाल्या की, तेव्हा तर मला मदरहुङ काय असते, हे सुद्धा माहीत नव्हते. आई झाल्यानंतर कसे वाटते, याची सुद्धा मला काहीच कल्पना नव्हती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.