अजिंक्य सिनेमाची उत्सुकता वाढवणाऱ्या टीझरनंतर नुकतेच सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सिनेमात प्रमुख भूमिका करणारे अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या विचार करायला लावणाऱ्या भावमुद्रा पाहून सिनेमाची कथा नक्कीच दमदार आणि काहीतरी वेगळी असणार यात शंका. त्यातही सिनेमातील इतर कलाकार अभिनेता उदय टिकेकर, अरुण नलावडे, अनिकेत केळकर, पल्लवी पाटील, प्रसाद जवादे, गणेश यादव, त्रियुग मंत्री यांच्या भूमिकांचा कोलाज छान जमून आला आहे. अजिंक्यची म्हणजेच भूषण आणि प्रार्थनेची अर्बन केमिस्ट्री मनाचा ठाव घेते.

निर्माते अरुणकांत शुक्ला, राघवेंद्र के. बाजपेयी, नीरज आनंद, बाबालाल शेख, राहुल लोंढे आणि वेद पी. शर्मा यांनी एकत्र येत या सिनेमाची निर्मिती केली आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कोल्हापूर आणि मुंबई या शहरांचा दिग्दर्शक अ. कदिर यांनी सिनेमाच्या चित्रीकरणात उत्तम वापर करून घेतला आहे. अजिंक्य सिनेमाबद्दल दिग्दर्शक कदिर म्हणतात, या सिनेमाची कथा आणि त्याचा नायक आपल्यातील एक आहे. वादळी वेगाने स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या प्रत्येकाला या सिनेमाचा नायक आपणंच असल्याचे सिनेमा पाहताना नक्की जाणवेल. अजिंक्य सिनेमाच्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक अ. कदिर यांचा हा पाहिलाच प्रयत्न असून त्यांनीच या सिनेमाची कथा-पटकथा-संवादही लिहीले आहे. सिनेमाचं संगीत रोहन-रोहन या प्रसिद्ध जोडीने दिलं आहे. २० मार्च २०२० ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.