या नव्या वर्षाच्या सुरुवातीला एका मराठी प्रसिद्ध कलाकाराच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालेलं आहे. सध्या मराठी मधील तर अनेक कलाकार लग्न करून मोकळी होत आहेत तर काहींनी लग्न केल्यानंतर त्यांना पोरं होत आहेत.

तर ज्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे, त्याचं नाव काय आणि गाव काय चला तर मग जाणून घेऊयात. मराठी कलाविश्वातील अभिनेता दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी नुकताच बाबा झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे. निपुणच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

निपुण आणि संचिता चांदोरकर यांच्या लग्नाला पाच वर्ष झाल्यानंतर त्यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. निपुणने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत.

यात एका फोटोमध्ये त्याची चिमुकली आईची कुशीत झोपली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये निपुणच्या खांद्यावर त्याचं बाळ अलगदपणे झोपलं आहे. याच दरम्यान, निपुण धर्माधिकारी हे नाव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहे. भाडिपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टीमुळे तो विशेष प्रकाशझोतात आला.

त्यासोबतच त्याने संगीत मानापमान, संगीत सौभद्र या संगीत नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. तर एमएक्स प्लेअरवरील Once a Year नावाच्या वेब सीरिजमध्येही त्याने काम केलं आहे.

निपुण धर्माधिकारी हा आधीच आपल्या कामामध्ये फार निपुण आहे. खूप युनिक असं काम करत असतो. तर त्याला त्याच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. आणि बाप झाल्याबद्दल ही खूप अभिमान अभिनंदन.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.