गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणजे नेहा आणि शार्दुल यांची, या दोघांनी पाच जानेवारीला लग्न केले आणि सोशल मीडियामध्ये खळबळ माजली. लग्न सोहळ्याची नेत्रदीपक छायाचित्रं माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये झळकू लागली. त्यांच्या या लग्नसोहळ्याला निवडक मित्रमंडळी उपस्थित होती, पण यासोबतच शार्दुल बायस याचे वैवाहिक जीवन देखील चर्चेत आले. याआधी देखील त्याचे दोन वेळेस लग्न झालेले आहे दोन्ही पत्नींसोबत त्याने घटस्फोट घेतला होता. जाणून घेऊयात शार्दुल च्या पहिल्या आणि दुसऱ्या बायको बद्दल.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शार्दुल च्या पहिल्या बायकोचे नाव नेहा बोरा होते तर दुसऱ्या बायकोचे नाव अनिता अग्रवाल असे होते.अनीता एक बिझनेस वुमन आहे. शार्दुलला रिया आणि आलिया या दोन मुली देखील आहेत. 2017 मध्येच शार्दुल आणि अनीता यांचा घटस्फोट झाला आणि पाच जानेवारी रोजी शार्दुलने नेहाशी लग्न केले. त्यामुळे नेहा शार्दुल ची तिसरी पत्नी आहे.

लग्नानंतर शार्दुल आणि नेहा ची जोडी नेट करांनी खूप ट्रोल केली. त्यांच्याविषयी अनेक ठिकाणी उलट सुलट चर्चा देखील घडताना आपण बघितली आहे. लग्नानंतर रिसेप्शनचे फोटो देखील नेटकरांनी चांगलेच व्हायरल केले.

नेहाने बॉम्बे टाइम्सला मुलाखत देताना सांगितले की,” ही काही मोठी गोष्ट नाही की शार्दुल चा दोन वेळा घटस्फोट झाला आहे.लग्नाआधीच मला याची पूर्ण कल्पना होती. याचा मोठा इशू करण्याची गरज नाही, शिवाय मी सुद्धा वर्जीन नाही याआधी मी देखील 3 रिलेशनशिपमध्ये होते. मी शार्दुल च्या बायकोला आणि त्याच्या मुलींना भेटले आहे.”

पुढे लग्नाविषयी बोलतांना नेहा म्हणाली,” माझ्या स्वप्नातील राजकुमाराशी लग्न करून मी आनंदी आहे. या निर्णयाने मी अत्यंत खूष आहे. या परिवाराचा हिस्सा होताना मला आनंद होत आहे. शार्दुलला दोन गोंडस मुली आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. त्याने माझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवली नाही. याआधी त्याचं लग्न झालंय या गोष्टीचा मला मात्र फरक पडत नाही.”

नेहाने मराठी सोबतच बॉलीवुड चित्रपटांमध्येही दमदार काम केलेले आहे. अनेक छोट्या पडद्यांवरही तिने काम केलेले आहे. ‘ मे आय कम इन मैडम ‘ मधून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिने बिग बॉस मध्ये देखील काम केलेले आहे. नेहा आणि शार्दुल यांना लग्नाच्या शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.