navratri-kon-hoeel-marathi-karodpati-special




 कोण होईल मराठी करोडपती नवरात्र खास
स्वप्नील जोशीसोबत नऊ अभिनेत्रींची HotSeat वर धम्माल

महाराष्ट्राचा सर्वोत्तम महामंच कोण होईल मराठी करोडपती पुन्हाएकदा सज्ज आहे
महाराष्ट्रातील तमाम लोकांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी. ३ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम कलर्स मराठीवर सुरु
होत आहे. कोण होईलचा पहिला भाग हा नवरात्री खास असणार आहे.

ज्यामध्ये प्रेक्षकांना बघायला
मिळणार आहे त्यांच्या नऊ आवडत्या आणि लाडक्या अभिनेत्रींना म्हणजेच सई ताम्हणकर, सोनाली
कुलकर्णी, अमृता खानविलकर, मनवा नाईक, प्रार्थना बेहेरे, मुक्ता बर्वे, पर्ण पेठे, गौरी नलावडे, गिरीजा
ओक.

कोण होईल मराठी करोडपतीमध्ये नवरात्री निमित्त स्त्री शक्तीला अभिवादन करण्यासाठी या
भागामध्ये खेळणाऱ्या नऊ महिला जोड्यांचे मराठी सिनेसृष्टीतील नऊ तारकांनी मिळून स्वागत केले आहे.
या कार्यक्रमाचा सूत्रधार म्हणजे महाराष्ट्राचा लाडका स्वप्नील जोशी याचे स्वागत मराठी आणि हिंदिमधील
ज्येष्ठ अभिनेत्री Rohini Hattangadi यांनी केले.




कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर या नऊ तारकांनी फक्त हॉट सीटवर बसून हा खेळच नाही खेळला
पण प्रेत्येक अभिनेत्रींनी स्पर्धकांना देखील प्रोत्साहन दिले.

यामधील बऱ्याच जणींच हॉट सीटवर बसण्याच
स्वप्न देखील पूर्ण झाल. या मंचावर आपल्या लाडक्या सह कलाकारा बरोबर म्हणजेच स्वप्नील
जोशीबरोबर त्यांनी बरीच धम्माल देखील केली.

सोनाली कुलकर्णी, प्रार्थना आणि स्वप्नील आपल्या
लोकप्रिय झालेल्या मितवा गाण्यावर नाच करून जमलेल्या प्रेक्षकांना खुश केले तर हॉट सीटवर मुक्ता
बर्वेची मिश्कील अदाकारीने धमाल उडवून दिली.

सई ताम्हणकर या कार्यक्रमामधील सूत्रधार म्हणजेच तिचा लाडका सह कलाकार स्वप्नील जोशीबद्दल
म्हणाली : “स्वप्नील माझा खूप चांगला मित्र आहे आमच्यातील मैत्री खूप घट्ट आहे, ज्याला मी नक्कीच
शब्दांमध्ये व्यक्त नाही करू शकतं.

आयुष्यात घडलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये तो मित्र म्हणून
माझ्या बरोबर असतो, अडचणीच्या वेळेस तो खंबीरपणे माझ्यासोबत उभा असतो त्यामुळे मला नक्कीच
चांगला आणि जवळचा मित्र मिळला आहे अस मी म्हणेन, आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला देखील हा मित्र
कोण होईल मराठी करोडपती या मंचाने मिळवून दिला आहे अस मला वाटतं. स्वप्नील त्याच्या या नव्या
कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा”.




 सोनाली आणि प्रार्थनाने देखील स्वप्नील बरोबर खूप मजा मस्ती केली. सोनाली स्वप्नीलला तिच्या
आयुष्यातील खरा मितवा असल्याचे सांगते. तीला बऱ्याच वर्षांपासून या hotseat बसण्याची इच्छा होती
आणि स्वप्नील देखील समोर आहे ते पण सूत्रधार म्हणून त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे. स्वप्नील
माझ्यासाठी माझ्या कुटुंबांमधलाच एक सदस्य आहे. मला कुठला सल्ला हवा असेल, एखादी चांगली वाईट
गोष्ट सांगयची असेल तर माझ्या आई-वडिलांबरोबर तर मी शेअर करतेच पण स्वप्नीलला देखील ती
गोष्ट

सांगते. त्यामुळे फक्त सिनेमा वा कामापुरता मितवा नसून तो खरच माझ्यासाठी मितवा आहे. स्वप्नीलला
त्याच्या या नव्या कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा.

अमृता खानविलकर आणि मुक्ता बर्वे ह्या hotseat बसल्यावर एक वेगळीच धमाल केली. “स्वप्नील हा
एक positive व्यक्तिमत्व असलेला माणुस आहे. त्याच्यामधली energy एखाद्याला थक्क करणारी आहे,
एखाद्याला त्याचा आधार वाटावा असा तो आहे. सगळ्यांशी आपुलकीने, आपलेपणाने वागणारा आहे.
त्यामुळे कोण होईल मराठी करोडपतीच्या मंच्यावर आलेल्या प्रत्येक माणसाला तो त्यांच्यातलाच एक
वाटेल जे या कार्यक्रमासाठी म्हत्वाच आहे. स्वप्नीलला माझ्याकडून त्याच्या नवीन कार्यक्रमासाठी खूप
शुभेच्छा.

नऊ अभिनेत्रींनी या गेम मध्ये जी धनराशी जिंकली ती उरी इथे पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात
जे महाराष्ट्रातील जवान शहिद झाले त्यांच्यातील दोन जवानांच्या कुटुंबियांना हि जिंकलेली धनराशी देण्यात
येईल.
या नऊ अभिनेत्री आणि त्यांनी मंचावर केलेली धमाल मस्ती नक्की बघा ३ ऑक्टोबरला रात्री ९.०० वाजता
फक्त कलर्स मराठीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here