मित्रांनो!, दाक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणजे अक्कीनेनी नागार्जुन. नागार्जुनने त्याच्या अभिनयाने अनेकांच्या मनावर जादू केली आहे. त्याचे संपूर्ण जगभरात चाहते असल्याचे पाहायला मिळते. नागर्जुन त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना सांगतच असतो पण त्याप्रमाणे तो अनेकदा त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही उघडपणे बोलताना दिसतो. आज २९ ऑगस्ट रोजी नागार्जुनचा वाढदिवस. नागार्जुनच्या लव्ह लाईफबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नागार्जुनने पहिली पत्नी लक्ष्मी डग्गुबतीसोबत वडिलांच्या सांगण्यावरुन लग्न केले होते.

नागार्जुन आणि लक्ष्मीने घरातल्यांच्या सांगण्यावरुन १९८४ साली लग्न केले. नागार्जुनचे वडिल नागेश्वर राव आणि लक्ष्मीचे वडिल रामानायडू डग्गुबती हे खूप चांगले मित्र होते. त्या दोघांनी त्यांच्या मुलांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला होता. लक्ष्मी आणि नागार्जुनचे लग्न झाले त्यावेळी नागार्जुन लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जात नव्हता. नागार्जुनला १९८६ मध्ये पूत्ररत्न झाला. त्याचे नाव नागा चैतन्य आहे.

पण सतत होणाऱ्या भांडणामुळे नागार्जुन आणि लक्ष्मीने १९९० साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी नागार्जुन अभिनेत्री अमालासोबत चित्रपटांमध्ये काम करत होता. त्यांनी ऐशीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी १९९२ मध्ये लग्न केले. १९९४ साली नागार्जुनला दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव अखिल अक्कीनेनी आहे.

असे म्हणतात की, तब्बूने तिचं करिअर जोरात असताना एका अभिनेत्यावर जिवापाड प्रेम केलं होतं. ते प्रेम इतकं घट्ट होतं की, त्याची जागा आजपर्यंत दुसरं कुणीही घेऊ शकलं नाही. अनेक अडचणींमुळे तब्बू त्या अभिनेत्यासोबत लग्न करू शकली नाही. आणि त्याच्यानंतर दुस-या कुणाशी तिला लग्नही करावं वाटलं नाही. तब्बूच्या स्वप्नातील राजकुमार होता साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेता नागार्जुन.

एक वेळ अशी होती की, तब्बू आणि नागार्जुनच्या प्रेमाची मोठी चर्चा होत होती. काही मॅगझिननुसार, तब्बू नागार्जुनवर खूप प्रेम करायची. ज्यामुळे ती मुंबई सोडून हैदराबादमध्ये रहायला गेली होती. पण तब्बूचं नशीब इतकं खोटं निघालं की, तिला तिचं ते प्रेम मिळालं नाही. मिडिया रिपोर्टनुसार, तब्बू आणि नागार्जुनचं प्रेम साधारण १५ वर्षांपर्यंत सुरू होतं. नंतर दोघे वेगळे झाले.

वेगळं होण्याचं कारण होतं नागार्जुनचं आधीच विवाहीत असणं. असे सांगितले जाते की, नागार्जुन आपल्या पत्नीला आणि मुलांना सोडून दुसरा संसार थाटणार नव्हता. ज्यामूळे तब्बूने त्याच्यापासून दूर जाणेच योग्य ठरवले. भलेही तब्बू आणि नागार्जुनचं यांच्यातील नातं संपलं असलं तरी आजपर्यंत तब्बू तिचं प्रेम विसरू शकली नाहीये. कदाचित हेच कारण असेल की, तब्बूने ४६ वर्षांची झाली तरी लग्न केलं नाही.

By the way… सुपरस्टार अभिनेता नागार्जुन आज आपला ६२ वा वाढदिवस (२९/०८/१९५९) साजरा करत आहे. स्टार मराठीच्या टीम तर्फे नागार्जुनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!