Nadi Vahate Marathi Movie New Poster Launch

999
बहुचर्चित ‘नदी वाहते’चं मोशन पोस्टर लाँच !!
 
– सप्टेंबरमध्ये चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला 
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “श्वास” या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या आगामी Nadi Vahate ‘नदी वाहते’ या बहुचर्चित चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असून येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
आताच्या काळात आपल्या गावातली नदी जगवणं, ती वाहती ठेवणं हे मोठं आव्हान आहे. नदीसाठी केवळ मोर्चे काढून, आंदोलनं करून भागणार नाही. तर, नदीचा योग्य पद्धतीनं वापर करणं ही काळाची गरज आहे, या आशयसूत्रावर ‘नदी वाहते’ बेतला आहे.  संवेदनशील विषय, कोकणाचा नयनरम्य पार्श्वभूमी या चित्रपटाची, उत्तम कलाकार ही या चित्रपटाची वैशिष्ट्यं आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि झी गौरव पुरस्कारांत या चित्रपटाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मोशन पोस्टरमधूनही चित्रपटाचं वेगळेपण अधोरेखित होत आहे.
चित्रपटात वसंत जोसलकर, पूनम शेटगावकर, आशा शेलार, जयंत गाडेकर, ह्रदयनाथ जाधव, शिव सुब्रमण्यम आदींच्या भूमिका आहेत. संदीप सावंत आणि नीरजा पटवर्धन यांच्या सहज फिल्म या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संजय मेमाणे यांनी छायांकन, नीरज व्होरालिया यांनी संकलन केले आहे. ध्वनी विभाग सुहास राणे व मंदार कमलापूरकर यांनी सांभाळला आहे तर कलादिग्दर्शन व वेशभूषा नीरजा पटवर्धन यांनी केलं आहे.