music-video-of-satyamev-jayate-pani-foundation-water-cup-competition

Music Video Of Satyamev Jayate Pani Foundation Water Cup Competition
This video features Paani Foundation’s co-founder Aamir Khan and other actors besides many Water Heroes.

  • Music  :  Ajay-Atul
  • Lyrics :  Guru Thakur
  • Singers :  Kiran Rao and Ajay Gogavale
  • Director   : Nagraj Manjule

पानी फाऊण्डेशनतर्फे वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता आमीर खान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी यावेळी उपस्थिती लावली. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या ध्यासाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 13 जिल्ह्यातील 30 तालुक्यांचा समावेश होणार आहे. विशेष म्हणजे आमीर खानने याबाबत जनजागृतीसाठी एक म्युझिक व्हिडिओही तयार केला आहे.

फडणवीसांच्या मनात जी पॅशन आहे, ती माझ्यात आणि सत्यजीत भटकळमध्ये ट्रान्सफॉर्म झाली आहे. या स्पर्धेला लोकचळवळीचं स्वरुप दिलं तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, हे मुख्यमंत्र्यांचं वाक्य माझ्या मनात पक्कं बसलं आहे, असं मनोगत आमीर खानने व्यक्त केलं. असे मुख्यमंत्री लाभणं आपलं भाग्य असल्याचंही आमीर म्हणाला.

तीन तालुक्यांपासून सुरु केलेला प्रवास 30 वर पोहचला आहे, तो दुप्पट करण्याचा निर्धारही आमीरने व्यक्त केला. दंगल चित्रपटाच्या यशाचं सोडा, दुसऱ्या पर्वात आम्ही यशस्वी झालो, तर खरा आनंद आहे, असंही आमीर म्हणाला.

वॉटर कपचं दुसरं पर्व सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनेता आमीर खानचं अभिनंदन केलं. आमीरची भूमिका रामायणातल्या हनुमानासारखी आहे, त्याला त्याच्या शक्तीची जाण करून द्यावी लागते. आमीर म्हणत होता ‘ये सब कैसे होगा, हमे और परफेक्ट होना होगा, मी म्हटलं आप हात में लोगे तो परफेक्ट ही होगा’ अशा शब्दात फडणवीसांनी आमीरचं कौतुक केलं.

‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हे गेली 40 वर्ष ऐकत आहोत, पण लोकचळवळ झाल्याशिवाय ते शक्य नव्हतं. आतापर्यंत लोकं आडवा आणि त्यांची जिरवा असंच सुरु राहिल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

प्रशिक्षांची इतकी मोठी फळी तयार झाली आहे की पुढच्या वेळी 30 ऐवजी 300 तालुके घेऊ शकतो. ही जलसेना तयार झाल्यामुळे हे सगळं शक्य झालं. पानी फाऊण्डेशनचा सहभाग महाराष्ट्राच्या जल संधारणाच्या कामाच्या इतिहासात लिहिला जाईल, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here