मित्रांनो!, सोनी टेलिव्हिजनवरील नेहमीच टॉप रँकिंगमध्ये राहणारी तुफान लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ तर तुम्ही पाहतच असाल, मग तुमच्या लक्षात एक महत्वाची गोष्ट आलीय का? आणि नसेल आली तर आम्ही सांगतो, सध्या तारक मेहतामधील प्रसिद्ध पात्र बबिताजी म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री मुनमुन दत्ता शूटिंगमधूनच आहे गायब. गेल्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री मुनमुन दत्ता शूटिंगला आली नसल्याचे सेटवरील सूत्रानुसार समजते आहे.

या संदर्भात मालिकेच्या चाहत्यांच्या मनांत हा प्रश्नं पडतोय की, खरंच का ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधून बबिताची झालीय एक्झिट? कारण दीर्घ काळापासून ती शूटिंगमधून आहे गायब. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे.

या मालिकेतील जेठालाल, तारक, दयाबेन, भिडे, बबिताजी अशा सर्वच पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेत बबिताची भूमिकेने देखील प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री मुनमुन दत्ताने. या भूमिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान, मुनमुन दत्ताने मालिका सोडल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळते आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. तसेच शूटिंगलाही बंदी होती. त्यामुळे बऱ्याच मालिकांनी आपले बस्तान इतर राज्यात हलविले होते. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे शूटिंग दमणमध्ये हलविण्यात आले होते. आता लॉकडाउन उठवल्यानंतर पुन्हा मुंबईत शूटिंगला सुरूवात झाली आहे.

मागील एक महिन्यापासून मुंबईत शूट सुरू आहे पण या कार्यक्रमाच्या शूटिंगमधून मुनमुन गायब आहे. ती एकदा सुद्धा सेटवर आलेली नाही. यातही विशेष म्हणजे तिची गैरहजेरी लक्षात घेऊन कथानकही लिहिले जात आहे. अशा परिस्थितीत मुनमुनने शो सोडला असल्याचा तर्क लावला जातो आहे. मात्र मुनमुनने अद्याप तरी मालिका सोडली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

यूट्यूब व्हिडिओमध्ये जातीवाचक शब्दाचा वापर केल्यामुळे मुनमुन वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या वादामुळे तिला तुरूंगात जावे लागले होते. तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता, मात्र नंतर कोर्टाने तिच्याविरोधात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरला स्थगिती दिली आणि तिला थोडा दिलासा मिळाला होता.