Mrunmayee Deshpande Husband

वाचकहो, आपल्याला सारख्या रसिक प्रेक्षकांना कला इंडस्ट्री मध्ये काम करणाऱ्या प्रसिध्द अभिनेता अभिनेत्री यांचं आयुष्य जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागून असते. त्या काय करताय ? कुठं जाताय ? कुठं राहताय ? अश्या अनेक गोष्टी त्यामध्ये येतात.

व्यक्तीच मन नेहमी प्रसन्न असेल तर ती व्यक्ती कोणतेही काम करण्यासाठी नेहमी उत्सुक असते. तशी एक मराठी मध्यें अभिनेत्री आहे. जिच्या नवऱ्या बद्दल आणि खऱ्या आयुष्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

नेहमी उत्सुक, खोडकर पण अतिशय प्रेमळ आणि गोड स्वभावाच्या अभिनेत्रीबद्दल आपण इथे बोलणार आहोत. कारण त्या अभिनेत्रीला पाहताच क्षणी आपलं मन प्रेमाने भारावून जाईल. अशी सुंदर, निरागस आणि दिलखुलास आहे ‘ ती ‘…

एकाच दगडात दोन पक्षी म्हणजेच, ही अभिनेत्री अभिनयाबरोबरच दिग्दर्शनही करते. कलेत वाहून घेण्याची जिद्द असली, की मग कलाकार कधीच मागे हटत नसतो.

तशी ही आहे. या अभिनेत्रीने हिंदी, मराठी चित्रपटात आणि मालिकांमध्येही अभिनय केला आहे. सध्या ती घराघरात, तरुणांच्या मनामनात पोहचलेली आहे. तिचे अनेक चाहते या महाराष्ट्रमध्ये आहेत.

या यशस्वी असणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे, मृण्मयी देशपांडे. तिचा जन्म २९ मे १९८८ ला पुण्यात झाला होता. बालपणही सारं पुण्यातचं गेलं. नाटकात काम करता करता पुढं इंडस्ट्रीत आघाडीच्या अभिनेत्रीत समाविष्ट झाली.

मृण्मयी ददेशपांडेचं महाविद्यालयीन शिक्षण सर्व काही पुण्यात झालेलं आहे.

ती पुण्यातील सदाशिव पेठेत राहणारी आहे, म्हणजेच ती एक अस्सल पुणेरी मुलगी आहे. त्यामुळे तिचा स्वभाव असा का आहे हे तुम्हाला आता समजलेच असेल खरंतर पुण्यातील माणसांची ती ओळखच आहे. त्यामुळे स्वाभाविकचं स्वभाव वेगळ्या पध्दतीने सांगण्याची काही गरज नाही.

तिने ‘एक कप चहा, शिकारी, नटसम्राट, फर्झद, १५ ऑगस्ट’ यांसारखे अनेक चित्रपट केले आहेत. मृण्मयीचे लग्न ” स्वप्नील राव” यांच्याबरोबर २०१६ मध्ये झाले. त्या दोघांची जोडी तुम्ही पाहिलीच असेल.

त्या दोघांचेही स्वभावही खूप मिळते जुळते आहेत. ज्यावेळी स्वप्नील मृण्मयीला बघायला गेला होता त्यावेळी मृण्मयीला पाहताक्षणीच त्याला तिच्यावर प्रेम झाले होते.

बऱ्याच कार्यक्रमांच्या मुलाखतीत तिने सांगितलेल्या आठवणी वरून आपल्या लक्षात आलं असेल, त्यांचं दोघांचं एकमेकांवर किती अतूट असं प्रेम आहे. निरागस. स्वप्नीलने त्याचे शिक्षण परदेशात केले आहे त्यामुळे तो जास्तकरून इंग्लिश मध्ये बोलताना दिसतो.

दोघेही सध्या सुखी संसारात रमलेले आहेत. दोघांना पुढील वैवाहिक वाटचाली साठी खूप शुभेच्छा.