Assa Sasar Sureks Bai Colors Marathi Tv Serial

Mrunal Going To America

अभिनेत्री मृणाल दुसानिस Mrunal Dusanis सध्या खुशीत आहे. मृणाल लवकरच तिच्या खऱ्याखुऱ्या सासरी, म्हणजे अमेरिकेला जाणार आहे.

‘अस्सं सासर सुरेख बाई’ Assa Sasar Surekh Bai या मालिकेतून आदर्श बायको आणि सूनेच्या भूमिकेत चमकणारी अभिनेत्री मृणाल दुसानिस Mrunal Dusanis सध्या खुशीत आहे. मृणाल लवकरच तिच्या खऱ्याखुऱ्या सासरी, म्हणजे अमेरिकेला जाणार आहे. त्यासाठी तिला मालिकेतून महिनाभर सुटी मिळाली आहे. अर्थात, ती इथे नसली तरी मालिकेत मात्र दिसेल. कारण आधीपासून नियोजन करून तिने एपिसोड्सची बँक करून ठेवली आहे.

तिचा नवरा नीरज मोरे हा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. गेल्या वर्षी त्यांचं लग्न झालं. मात्र मृणाल इथं मालिकेच्या शूटमध्ये व्यग्र तर नीरज तिथं अमेरिकेत काम करत असल्यानं त्यांना एकमेकांसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. गणेशोत्सवात तो काही दिवसांसाठी भारतात आला होता. त्याआधी आणि नंतरही हे दोघं स्काइप कॉल्सच्या मदतीनं संपर्कात असतात. अखेर त्यांच्यातला हा दुरावा काही दिवसांसाठी मिटणार असल्याचं समजतं. याबद्दल मृणाल दुसानिस Mrunal Dusanis ला विचारलं असता ती स्पष्ट काही सांगत नाही. ‘या सुटीसाठी मी खूप आधीपासूनच प्लॅनिंग केलं होतं. त्यानुसार माझ्या महिनाभराच्या सुट्ट्या मंजूरही झाल्या आहेत. मी काही दिवस घरी आराम करणार आहे. पण अमेरिकेत जायचं की नाही याबाबत आता फार काही बोलता येणार नाही.’