पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा त्यांच्या फिटनेसचे चाहते आहेत असच म्हणावं लागेल; कारण काही दिवसांपूर्वी ऑनलाइन कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी सध्याच्या फिटनेस किंग यांना प्रश्न विचारला की, आपलं वय आणि फिटनेस यांचा ताळमेळ खराय का ?…ज्यांचे देशाचे पंतप्रधान चाहते आहेत, अश्या प्रसिध्द अभिनेता, मॉडेल असणाऱ्याचं आहे, मिलिंद सोमण.

बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि मॉडेलिंग जगतात नाव कमावल्यानंतर आपल्या फिटनेसबाबत नेहमीच चर्चेत असलेले मिलिंद सोमण आज प्रत्येकाचे रोल मॉडेल आहेत. मिलिंद सोमण यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1965 रोजी झाला होता. यावर्षी मिलिंद सोमण हे त्यांचा 55 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

मिलिंद सोमण अजूनही देशातील लोकप्रिय मॉडेल्समध्ये येतात. या वयातही जेव्हा मिलिंद रॅम्पवर चालतात तेव्हा तरुण मॉडेल्स त्याच्यासमोर फिके दिसतात. चला मिलिंद सोमण यांच्या वाढदिवससा निमित्त त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी जाणून घेऊयात.

मिलिंद सोमण हा अभिनेता आज एक फिटनेस किंग आहे. मिलिंदने 2015 मध्ये आयरमन चॅलेंज पूर्ण केलं होतं. ज्यात त्यांना भारतीय आयर्नमॅन ही पदवी देण्यात आली.

हे आव्हान मिलिंद सोमण यांनी 5 तास 19 मिनिटांत पूर्ण केलं होतं. १९९५ मध्ये मिलिंद सोमण यांना एका जाहिरातीसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. ज्यानंतर तो वादात सापडला होता.

त्यांच्यासमवेत तत्कालीन प्रसिद्ध महिला मॉडेल मधु सप्रे देखील होती. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट या चित्रात दोन्ही सुपरमॉडल्स आपली जबरदस्त फिगर दाखवताना दिसत होते.

मिलिंदच्या न्यूड फोटोशूटमुळे संतप्त झालेल्या अनेक सोशल ग्रुपने निषेध व मोर्चे काढण्यास सुरुवात केली होती. त्यावर कायदेशीर कारवाई तब्बल 14 वर्षे चालू राहिली आणि अखेर २००९ मध्ये कोर्टाने या जाहिरातीच्या बाजूने निकाल दिला.

या जाहिरातीमध्ये भारतीय संस्कार, संस्कृती, मूल्ये आणि शिकवण याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते.

यानंतर मिलिंद सोमण हे आपल्या 25 वर्षांच्या प्रेयसीविषयी सुद्धा फार चर्चेत आले होते. मिलिंद सोमण यांनी अंकिताशी 22 एप्रिल 2018 रोजी लग्न केलं.

मिलिंदने एका फॅशन शो दरम्यान अंकिताची लोकांशी ओळख करून दिली. मिलिंद आणि अंकिताने लग्नापूर्वी काही वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. प्रेम वाढत गेलं आणि पुढं प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं.

एक वयाची पन्नाशी ला खेटलेला आणि दुसरी २५ शी तल्या ऐन तारुण्यातली, मिलींद सोमण आणि अंकिता यांची जोडी आजही कायम चर्चेत आहे. सध्या ते त्यांचं वैवाहिक जीवन जगत आहेत.