काही मालिका खूप वर्षं चालतात; पण तरीही त्या प्रेक्षकांच्या मनातून उतरत नाहीत. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका अशीच आहे जी खुप लोकप्रिय झालेली आहे. त्यातली एक ना एक पात्रे खूप लोकप्रिय आहेत. पण कोणतीही गोष्ट अति नको असते.

त्यामुळे आता लवकरच ही मालिका जाऊन दुसरी एक नवीन मालिका येणार आहे. आता ती दुसरी मालिका कोणती असणार आहे. तर तेही आता आपल्याला लवकरचं कळेल. तर चला मग जाणून घेऊ सविस्तर.

झी मराठीवरील प्रत्येक मालिका ही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. प्रत्येक मालिकेचं एक वेगळेपण झी मराठीने आतापर्यंत जपलं आहे. झी मराठीवरील अनेक मालिका आणि मालिकेतील पात्र ही प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. या जागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ . ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. ७ मार्च रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होत आहे. राधिका सुभेदारने गृहिणी ते यशस्वी उद्योजिकापर्यंत गाठलेला प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

यावेळी झी मराठीवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘घेतला वसा टाकू नका’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोजच्या धाटणीपेक्षा वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पौराणिक कथा वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. भगरे गुरूजी ही कथा मांडणार आहे.

झी मराठीवरील मालिका ‘लाडाची मी लेक गं’ ही दुपारी २.३० वाजता दाखवण्यात येणार आहे. या मालिकेची वेळ बदलण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अण्णा नाईक आणि शेवंता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘नाईकांचा वाडा’ आता कशा अवस्थेत असणार?

हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे. सोशल मीडियावर अण्णा नाईक परत येणार आहे, अशी चर्चा रंगली होती. आता मालिकेचा प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अण्णा नाईक येणार म्हणल्यावर प्रेक्षकांना खूप जवळचं वाटलं असेल कारण अण्णा आणि शेवंता प्रेक्षकांना खूप आवडते. पण आता बघुयात कि तिसऱ्या पर्वात नेमकं काय आहे ते. या सगळ्या मालिकांना पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा