जर आपलं हक्काचं कुणी कायमचं सोडून गेलं तर आयुष्य किती निरस होतं. जगण्याचा आनंद कुठं तरी हरवून बसतो. लॉकडाऊन दरम्यान अभिनेत्री मयुरी देशमुख चा नवरा आशुतोष च्या आ’त्म’ह’त्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली होती. मयुरी सुद्धा खूप दुःखी झाली होती. पण तिनं यातून कलेची वाट काढलेली आहे. पुन्हा जोमाने काम करायचं ठरवलं आहे.

नवरा सोबत शरीराने नसला तरी मनाने आयुष्यभर आहे, असं मनाशी गाठ बांधून ती एका हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारून पुनराग करत आहे.आता ती मालिका कोणती ? वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आपल्याला पडली असतील. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. पती आशुतोष भाकरेच्या आ’त्म’ह’त्ये’नंतर तीन महिन्यांनी मयुरीने नवा प्रोजेक्ट हाती घेतला आहे.

स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत मयुरी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून या मालिकेच्या निमित्ताने तिने हिंदीत पदार्पण केलं आहे. यामध्ये ती अभिनेता गश्मीर महाजनीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मालिकेचा प्रोमो सध्या खूप व्हायरल होत आहे.

कुल्फी कुमार बाजेवाला’ या लोकप्रिय मालिकेची ‘फोर लायन्स’ ही निर्मिती संस्था ‘इमली’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणतेय.

ही मालिका हिंदी भाषेत असली तरी यात गश्मीर आणि मयुरी असे दोन मराठी चेहरे झळकणार आहेत. मराठी चेहरे प्रमुख भूमिकेत झळकत असल्याने मराठी प्रेक्षकांना ही इमली बघायची ओढ लागलेली आहे.

पतीच्या आ’त्म’ह’त्ये’नंतर मयुरी बराच काळ सोशल मीडियावर नव्हती; पण मध्यंतरी तिने मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ केला होता. ज्यात नवऱ्याच्या खूप आठवणी होत्या.

मयुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. ‘तुम्हा सर्वांनी माझ्यासाठी व माझ्या कुटुंबीयांसाठी केलेल्या प्रार्थनांसाठी मी कृतज्ञ आहे. आभारी आहे. असेच सोबत रहा.तुमच्या प्रेमातूनच प्रोत्साहन घेत मी नवीन सुरुवात करतेय. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत असू द्या’, असं तिने या प्रोमो शेअर करत म्हटलंय.