swapnil-joshi

‘कलर्स मराठी’-‘कोण होईल मराठी करोडपती’ तर्फे शहीद जवानांना मदतीचा हात

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

कलर्स मराठीवर नुकताच सुरु झालेला लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होईल मराठी करोडपती’चा ज्याचे सूत्रसंचालन स्वप्नील जोशी करतो आहे त्याचा पहिला भाग ३ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. ज्यामध्ये मराठीतील नऊ प्रसिध्द अभिनेत्री म्हणजेच मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, प्रार्थना बेहेरे, सोनाली कुलकर्णी, पर्ण पेठे, मनवा नाईक, ह्यांनी स्पर्धकांचे स्वागत केले. या कार्यक्रमामध्ये या नऊ अभिनेत्री ‘कोण होईल मराठी करोडपती’ हा गेमदेखील खेळला ज्यात त्यांनी तब्ब्ल तीन लाख वीस हजार इतकी रक्कम जिंकली. हि रक्कम उरी येथील शहीद जवान यांना कलर्स मराठी आणि ‘कोण होईल मराठी करोडपती’ तर्फे देण्यात आली.

‘कोण होईल मराठी करोडपती’ या कार्यक्रमात नेहेमीच कलाकारांनी जिंकलेली रक्कम NGO किंवा गरजू लोकांच्या मदतीस देण्यात येते.navratri-kon-hoeel-marathi-karodpati-special

“कलर्स मराठी ‘कोण होईल मराठी करोडपती’च्या सहाय्याने नेहमीच सकारात्मक पद्धतीने एखाद्या व्यक्तीचे जग बदलण्याचा प्रयत्न करीत असते. उरी येथील भीषण हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मदत ही त्याच उपक्रमाचा एक भाग आहे, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन आपल्या देशासाठी अर्पण केले, ज्यांच्यामुळे आपण आपल्या देशात सुरक्षित राहू शकतो त्यांना मदतीचा हात दिलाच पाहिजे”, असे कलर्स वाहिनी प्रमुख अनुज पोद्दार म्हणाले.

chek-swpanil-joshi

उरी येथे झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र नाही तर भारत हादरला या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील ४ जवान शहीद झाले ज्यामधील सातारामधील चंद्रकांत गालांडे आणि यवतमाळ मधील विकास कुलमेठे यांना तब्बल तीन लाख वीस हजार इतक्या धनराशीची मदत केली. ही रक्कम कलर्स मराठी स्वत: जवानांपर्यंत पोहचविण्याची सोयदेखील करणार आहे.

आपल्या देशासाठी आयुष्यभर झटणाऱ्या या जावांनाना कलर्स मराठी तर्फे एक छोटीशी मदत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here