मराठी सिनेसृष्टीत आजवर आपल्या अभिनयाने सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर. तर नुकताच अभिनेता ऋषी सक्सेना याचा वाढदिवस पार पडला आणि इशाची पोस्ट सर्वत्र व्हायरलं झाली. मुळातच ईशा केसकर ही अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याची अनेकदा पहायला मिळते. तिने याआधीही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेक फोटो आणि व्हिडिओज शेअर केलेले पहायला मिळतील.

मुळात ईशा केसकरच्या सध्याच्या ऋषी सक्सेना या अभिनेत्याच्या जन्मदिवसाच्या पोस्टबाबत सध्या बरीच चर्चा सर्व ठिकाणी रंगल्याची पहायला मिळते. मराठी सिनेसृष्टीतलं रिलेशनशीपमधे असणारं कपल म्हणून ऋषी सक्सेना आणि ईशा केसकर हे दोघेही सर्वांनाच परिचित आहेत. ईशाने सध्या जी ऋषी सक्सेनाबाबत पोस्ट लिहिली आहे तिच्यावर तिने मेन्शन केलं आहे की, हा केवळ माझा बॉयफ्रेंड नाही तर बेस्टफ्रेंड देखील आहे.

सोबतच त्याबाबत ती असंही म्हणते की, “तो तिचा गोड, दयाळू, माणूस असून गेल्या काही वर्षांत अनेक अडचणींचा सामना ती त्याच्यामुळे पार करू शकली. आय लव्ह यू” असंही ती त्याला थेट यावेळी म्हणाली आहे. ईशा केसकर आणि तिचा बॉयफ्रेंड असणारा अभिनेता अर्थात ऋषी सक्सेना हे दोघेही इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांचे एकमेकांसोबत फोटोज शेअर करत असल्याचे आजवर पहायला मिळाले आहे.

या दोघांच्या केमिस्ट्रीला अनेक रसिकांनी नेहमीच दाद दिली आहे. ईशा आणि ऋषी ही जोडी एकमेकांना तब्बल गेल्या तीन वर्षांपासून डेट करत असल्याची खबर सर्वांना आजकाल लागलीच आहे. “चला हवा येऊ द्या” या कार्यक्रमाच्या सेटवर दोघांची प्रथम ओळख झाली होती. ऋषी सक्सेना या अभिनेत्याला आजवर तुम्ही रसिकप्रेक्षकांनी झी टिव्ही वाहिनीवरील “काहे दिया परदेस” या मालिकेतून पाहिलं आहे. आणि ईशाच्या बाबतीत म्हणालं तर केवळ “बानू” हे पात्र तिची ओळख सांगून जातं.

ईशा केसकर हिने झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका “जय मल्हार” या मालिकेतील “बानू” ही व्यक्तिरेखा अगदी उत्कृष्टपणे साकारली होती. ईशाला त्या व्यक्तिरेखेने एक वेगळीच ओळख तमाम रसिकप्रेक्षकांमधे करवून दिली. या भवदिव्य मालिकेचा एकूण तीन वर्षांचा कार्यकाळ झी मराठी साठीच नव्हे तर रसिकप्रेक्षकांसाठीही अभुतपूर्व ठरला होता.

याशिवाय आपल्याला माहितच आहे की, ईशा केसकर ही माझ्या नवर्‍याची बायको या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. गर्लफ्रेंड, सिआरडी, हॉर्न ओके प्लीज यांसारख्या सिनेमांमधून ती मोठ्या पडद्यावर झळकली आहे. काहे दिया परदेस मालिकेतून रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्यानंतर ऋषी सक्सेना हा अभिनेता आता लवकरच एका वेबसिरीजच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे.

ऋषी सक्सेना तसं पाहता मराठी सिनेसृष्टीत एक सरळ साधेपणाने त्याची भुमिका वठवणारा कलाकार समजला जातो. दुसरीकडे पुण्यासारख्या कला आणि संस्कृतीने संपन्न असलेल्या शहरातून आलेली ईशा नेहमीच तिच्या अभिनय कौशल्याने अगदीच वाखाणली जाते. ईशाने आजवर अनेक नाटकांमधून काम केलेलं पहायला मिळतं.

पुण्यातल्या सिम्बॉयोसिस महाविद्यालयातून तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मंगलाष्टक वन्स मोअर, वी आर ऑन होऊन जाऊ द्या, हॅलो नंदन! यांसारख्या चित्रपटांमधूनही तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. “रायगडाला जेव्हा जाग येते” या गाजलेल्या नाटकात तिने एकेकाळी येसूबाईंची भुमिकादेखील बजावल्याची पहायला मिळते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!