आता जमाना ऑनलाईनचा आहे हे लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्ती असो वा कलाकार प्रत्येकजण ऑनलाईच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. असाच एक छान प्रयोग आपल्या मराठी कलाकारांनी केला आहे. डान्स अंताक्षरी हे पाच मराठी कलाकारांचे मयुरी वाघ, गौतमी देशपांडे, शर्मिष्ठा राऊत, विदिशा म्हसकर, सायली परब शेलार या प्रतिभावान, सुंदर अभिनेत्रींसह एक आगळंवेगळं सादरीकरण नुकतेच संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या मिरीयाड आर्ट युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे.
आजच्या या तणावपूर्वक परिस्थीतीत आपल्या लाडक्या अभिनेत्री डान्स अंताक्षरीमधून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत. आपल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि जुन्या नव्या गाण्याची आठवण करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लॉकडाऊनच्या काळात कलाकार सुद्धा आपल्या प्रेक्षकांची आठवण येत असेल, आणि त्याची कला सुद्धा एक वेगळ्या प्रकारे आपल्याला रसिकांपर्यंत पोहचविता येईल असा विचार करुन बैठे बैठे क्या करे… डान्स अंताक्षरी करे! ही संकल्पना मिरियाड आर्ट्स घेऊन आली असे श्रेयस देसाई सांगतात. या डान्स अंताक्षरीचे सादरीकण आपल्या प्रसिद्ध अभिनेत्री करत असून त्याचे नृत्यदिग्दर्शन मिरीयाड आर्ट्सच्या श्रेयस देसाई यांनी केले आहे.
बैठे बैठे क्या करे… या चारोळीने आपली गाण्याची अंताक्षरी आपण नेहमीच विरंगुळा म्हणून खेळतो. पण नव्या अंदाजामध्ये हीच अंताक्षरी ‘डान्स अंताक्षरी’ मराठी अभिनेत्री आपल्यासमोर सादर करणार आहेत. या सर्व अभिनेत्रींना एकत्र करण्याचे कार्य मयुरी वाघ या अभिनेत्रीने केले आहे. तर डान्स अंताक्षरी ही कॉन्सेप्ट सायली परब शेलार या अभिनेत्रीला सुचवली.