तुम्हाला कदाचित या मराठी अभिनेत्रीचं नाव परिचित असेलच. कारण तिने कित्येकदा आपलं मनोरंजन तिच्या भुमिकांमधून केलं आहे. ही अभिनेत्री काही ठराविक काळानंतर पुर्णत: परदेशात स्थायिक झाली आहे. तर ही अभिनेत्री दुसरीतिसरी कोणी नसून, ती आहे अर्चना जोगळेकर.

अर्चना जोगळेकर हिने आजवर रसिकप्रेक्षकांसमोर आपल्या अदाकारीमधून अनेक चांगल्या उत्कृष्ट दर्जेदार कलाकृतीचा आस्वाद मांडला. अर्चना जोगळेकर या अभिनेत्रीने मराठी सोबतच हिंदी, ओडिशा व इतर भाषांमधील सिनेमांमधेही काम केलं आहे. एके काळी तिने अक्षरश: तमाम भारतीय रसिकप्रेक्षकाला आपल्या अभिनयाची व सोबतच सौंदर्याची भुरळ पाडली होती. त्या ठराविक काळात सिनेमे करत असताना अर्चना जोगळेकर यांना प्रचंड प्रमाणात चाहत्यांची साथ लाभली.

या सर्व गोष्टींव्यतिरिक्त अर्चना जोगळेकर ही एक उत्कृष्ठ नर्तिका अर्थात डान्सर राहिली आहे. तिने कथ्थक अगदी उत्तमरित्या नेहमीच साकारलं आहे. अर्चनाने तिची आई आशा यांच्याकडून कथ्थकचे धडे गिरवले आहेत. तिच्या आईच्या नृत्य शिकवणाऱ्या क्लासेसमधून अनेक मराठी अभिनेत्रींनी कथ्थकचे धडे गिरवले आहेत.

अर्चनाने हळूहळू सिनेमासृष्टीतून काढता पाय घेत थेट अमेरिकेत आपल्या कथ्थकच्या स्वत:च्या डान्स स्कूलची स्थापना केली. एका अर्थी परदेशात आपली संस्कृती व कला पोहोचवण्याच्या दिशेने हे पाऊल वाखाणण्याजोगं आहे असंच म्हणावं लागेल. दुसरीकडे तुम्हाला अर्चनाचा चार्म पाहून कधीच वाटणार नाही की, अर्चना सध्याच्या घडीला थेट ५६ वर्षांची आहे. चेहऱ्यावर सतत तेज आणि ग्लॅमरस साज आजही ही अभिनेत्री जपून आहे, हे विशेष.

अर्चना जोगळेकर हिने जरी आज चित्रपटसृष्टीपासून दुरी बनवली असली तरीदेखील कलेला आणि कलाकृतीला ती जपत आहे, हे महत्वाचं आहे. ती आजही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सर्व रसिकप्रेक्षकांच्या व इतरांच्या संपर्कात असते. ती आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नृत्यकलेबाबत व कथ्थक नृत्याबाबत अनेक अपडेट शेअर करत असते.

अर्चनाने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत मराठीत एका पेक्षा एक, निवडुंग, अनपेक्षित यांसारख्या मराठी सिनेमांमधे काम केलं आहे. संसार, आतंक ही आतंक, आग से खेलेंगे या हिंदी सिनेमांमधेही उत्कृष्ट भुमिका साकारल्या आहेत. यासोबत अर्चनाने टिव्ही मालिकांमधेही काम केल्याच आजवर पहायला मिळालं आहे.

“मॅरीड टू अमेरिका” हा अर्चनाचा शेवटचा २०१२ साली आलेला चित्रपट ठरला होता, त्यानंतर अर्चना कधीही सिनेसृष्टीत पहायला मिळाली नाही. चुनौती, कर्मभूमी, फुलवती या तिच्या टिव्ही मालिकांनाही चांगली प्रसिद्धी लाभल्याच पहायला मिळालं होतं. अर्चना जोगळेकर “सुना चढेई” व “स्त्री” या दोन्ही ओडिसा भाषिक सिनेमातही भुमिका साकारल्या आहेत.

याशिवाय तिच्या आणखी इतर कामांबद्दल बोलायचं झालं तर मर्दानगी, बात है प्यार की, बिल्लो बादशाह, तमीळ भाषिक असलेला मोगमुल, आग से खेलेंगे यांसारख्या चित्रपटांमधून ती मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. अर्चना जोगळेकर हिने ९० च्या दशकात सिनेसृष्टीतल्या इतर कलाकारांवर तर आपल्या अभिनयाने व सौंदर्याने भुरळ घातलीच होती शिवाय तिने आपल्या दिलखेचक अदांमधून सर्वांना अक्षरश: भुरळ पाडून सोडलं होतं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!