मराठी सिनेसृष्टीत सध्याच्या घडीला फारच चर्चेत राहणारी आणि कायम आपल्या अभिनयाच्या दर्जाने रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनाली कुलकर्णीच्या अनेक कलाकृती आज नाही म्हटलं तरी रसिकप्रेक्षकांच्या मनात इतक्या लोकप्रिय होऊन बसल्या आहेत की जणू त्यांना तोडचं नाही. आणि सध्याच्या घडीला आतातर एक नवा क’ह’र’चं झालायं.

हा क’ह’र म्हणजे असा आहे की याने तिच्या चाहत्यांना अजून तिच्या प्रेमात पडायला जणू भाग पाडलं आहे. सोनाली सध्याच्या घडीला प्रकाशझोतात येण्याचं मुळ कारण म्हणालं तर तो तिचा विना मेक-अप लुक. अर्थातचं अनेक सेलीब्रेटी कलाकार अनेकदा बॉडी शेमिंग अथवा इतर गोष्टींविषयी आपलं मत मांडताना पहायला मिळतात. पण त्यांपैकी काहीचजण काही बाबी आमलात आणून सत्याचा प्रत्यय देत असतात. तर सोनालीनेदेखील असचं काहीस पाऊल उचलल्याचं पहायला मिळतयं असं म्हणायला हरकत नाही.

मराठी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या असलेल्या अभिनेत्री सोनालीने जे तिचे विना मेक-अप लुक्सचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत त्यांना अनेकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा पहायला भेटत आहे. इतर अनेक ठिकाणी तिचे हे फोटोज शेअर आणि लाईक्सदेखील केले जात आहेत.

अनेकांनी तिच्या या फोटोवर फार भन्नाट अशा कमेंट्सदेखील केलेल्या पहायला मिळतं आहेत. सोनालीने शेअर केलेल्या या फोटोंनी सोशल मीडिया पुरता हादरवून सोडला आहे, हे निश्चित. सोनाली कुलकर्णी हिला हिरकणी या तिच्या गाजलेल्या आणि प्रचंड हिट ठरलेल्या सिनेमाकरता नुकताच फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे.

सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी झिम्मा या सिनेमातून रसिकप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय सोनाली कुलकर्णी हिला हिरकणी नंतर “छत्रपती ताराराणी” यांच्या आयुष्यावर बनत असलेल्या सिनेमातही छत्रपती ताराराणी यांचीच भुमिका साकारायची संधी मिळणार आहे. या सिनेमाचं पोस्टरदेखील तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेलं पहायला मिळालं आहे.

सोनाली कुलकर्णी तिच्या सोशर मिडियावर फारच एॅक्टिव्ह असेलली अनेकदा पहायला मिळते. सोनाली आपल्या चाहत्यावर्गाशी सतत आपले नवे फोटोशुट केलेले फोटोज, काही व्हिडिओज व इतर बाबी शेअर करत असते. सोनालीचा चाहतावर्ग आज प्रचंड मोठा आहे. सोनालीने आपल्या काही खास भुमिकांमधून जी रसिकप्रेक्षकांच्या मनात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे त्याला खरचं तोड नाही, असं म्हणावं लागेल.

सोनाली कुलकर्णीच्या पोश्टर गर्लमधल्या पात्राने ज्या प्रकारे तमाम महाराष्ट्राच्या रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं, तशाच तिच्या इतर अनेक भुमिकांनीही रसिकप्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सोनाली कुलकर्णी खरतरं तिच्या पहिल्याचं सिनेमातून हिट भुमिका देणारी अभिनेत्री ठरली होती.

“बकुळा नामदेव घोटाळे” या सिनेमातून तिचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झालं होतं. केदार शिंदे यांचा धमाल विनोदी असलेला हा सिनेमा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आणि गाजलादेखील. सोनालीला या सिनेमाकरता बेस्ट पदार्पण केलेली अभिनेत्री असा पुरस्कारदेखील झी मराठीकडून मिळाला होता. सोनाली कुलकर्णी आजही तिच्या अभिनयाच्या अंगभूत कलागुणांमुळे सरस ठरत असलेली पहायला मिळते आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!